सातबाराचे उतारे आॅफलाइनही मिळणार
By Admin | Updated: May 7, 2016 01:53 IST2016-05-07T01:53:23+5:302016-05-07T01:53:23+5:30
राज्यात सातबाराचे उतारे आॅनलाइन दिले जात असले तरी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने ते ३१ मे पर्यंत कर्मचाऱ्यांकडून तयार करूनही दिले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
सातबाराचे उतारे आॅफलाइनही मिळणार
मुंबई : राज्यात सातबाराचे उतारे आॅनलाइन दिले जात असले तरी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने ते ३१ मे पर्यंत कर्मचाऱ्यांकडून तयार करूनही दिले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली असल्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
राज्यातील हजारो शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांना कृषी कर्ज घेण्यासाठी सातबाराचे उतारे तातडीने मिळणे आवश्यक आहे. मध्यंतरी तलाठी संपाचा फटका आॅनलाइन प्रक्रियेला बसल्याने ती रेंगाळली होती. या पार्श्वभूमीवर, ३१ मेपर्यंत आॅफलाइन सातबारा उतारे देण्यास अनुमती द्यावी, आपण मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यांनी ती आज मान्य केल्याचे राठोड म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)