धुळे जिल्ह्यातील शिरपूरजवळ केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट, सात जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 11:55 AM2019-08-31T11:55:44+5:302019-08-31T11:57:25+5:30

सुमारे ४० जण जखमी, अधिकारी घटनास्थळी दाखल

 Seven people were killed in a blast at a chemical factory near Shirpur in Dhule district | धुळे जिल्ह्यातील शिरपूरजवळ केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट, सात जणांचा मृत्यू

धुळे जिल्ह्यातील शिरपूरजवळ केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट, सात जणांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देकेमिकल फॅक्टरीत आज सकाळी भीषण स्फोट झाला.अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल कंपनीत स्फोट नेमका कशामुळे झाला याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

आॅनलाइन लोकमत
धुळे- जिल्ह्यातील शिरपूरजवळ असलेल्या वाघाडी येथे एका केमिकल फॅक्टरीत शनिवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटात ७ जण ठार झाले तर जवळपास ४० जण जखमी जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना वाघाडी-बाळदे रस्त्यावर घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झालं आहे.
शिरपूर येथे असलेल्या एका केमिकल फॅक्टरीत आज सकाळी भीषण स्फोट झाला. यात सात जण मृत्यूमुखी पडले असून २० जण जखमी झाले आहे. मृतांपैकी पीनाबाई जितेंद्र पावारा (३५, रा. चांदसूर्या), रोशनी पावरा (१४ रा. चांदसुर्या), सुबीबाई रमेश पावरा (२५ रा. चांदसूर्या ), पंजाबाई विशाल पावरा (२५, रा. वकवाड ), रमेश सजन कोळी(३५,रा. वाघाडी) यांची ओळख पडली असून, दोन जणांची अद्याप ओळख पटलेली नाही. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान कंपनीत स्फोट नेमका कशामुळे झाला याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
दरम्यान ही कंपनी मुंबईच्या उमीत गृपने चालवायला घेतली होती. या कंपनीत औषधांना लागणारे केमिकल तयार होत होते. कंपनीचे काम तीन शिफ्टमध्ये चालते. एका शिफ्टमध्ये ४० ते ५० कामगार काम करतात. शिफ्ट बदलण्याच्यावेळेसच ही दुर्घटना घडली. या स्फोटांचा सर्वाधिक फटका वाघाडी गावाला बसला आहे.
घटनास्थळी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक एम.एन. रत्नपारखी हे देखील पोहचले आहेत.

Web Title:  Seven people were killed in a blast at a chemical factory near Shirpur in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे