ऐन दिवाळीत सात घरे आगीत भस्मसात

By Admin | Updated: November 12, 2015 03:05 IST2015-11-12T03:05:41+5:302015-11-12T03:05:41+5:30

गुंडगेवाडी (ता. शिराळा) येथे मंगळवारी रात्री लागलेल्या आगीत सात घरे भस्मसात झाली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र ऐन दिवाळीत नऊ कुटुंबे उघड्यावर आली आहेत.

Seven houses in An Diwali were burnt by fire | ऐन दिवाळीत सात घरे आगीत भस्मसात

ऐन दिवाळीत सात घरे आगीत भस्मसात

वारणावती (जि. सांगली) : गुंडगेवाडी (ता. शिराळा) येथे मंगळवारी रात्री लागलेल्या आगीत सात घरे भस्मसात झाली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र ऐन दिवाळीत नऊ कुटुंबे उघड्यावर आली आहेत.
मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास आनंदा शंकर गुंडगे यांच्या घराला आग लागली. जोराच्या वाऱ्यामुळे आगीने क्षणातच रौद्ररूप धारण केले. त्यामुळे शेजारच्या सात घरांनीही पेट घेतला. सर्व प्रापंचिक साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. पहाटे पाचच्या सुमारास आग आटोक्यात आली.
येथील युवकांनी वेळीच
धावपळ करून सात घरांतील व्यक्तींना, जनावरांना सुरक्षितस्थळी हलविल्याने जीवितहानी टळली. शिवाय लागून असलेल्या घरांचे वासे तोडून संपर्क तोडण्यात आला.
यामुळे शेजारची घरे आगीपासून वाचली. (वार्ताहर)

Web Title: Seven houses in An Diwali were burnt by fire