शेतक-यांच्या सातबारा, आठ अ व फेरफारमध्ये चुका
By Admin | Updated: August 17, 2016 13:53 IST2016-08-17T13:53:13+5:302016-08-17T13:53:13+5:30
मागील तीन ते चार वषार्पासून दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या सातबारा, आठ अ व फेरफारामध्ये अनेक चुका असल्याने शेतक-यांना त्रास सहन करावा लागत आहे

शेतक-यांच्या सातबारा, आठ अ व फेरफारमध्ये चुका
>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १७ - मागील तीन ते चार वषार्पासून दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या सातबारा, आठ अ व फेरफारामध्ये अनेक चुका असल्याने शेतक-यांना त्रास सहन करावा लागत आहे. जमिनीचे क्षेत्रफळ कमी होणे व नविन नावे समाविष्ट नसणे, कुळाचे भोगवटदार वर्गमध्ये नावेच नसणे यामुळे शेतक-यांना शेतीची कामे धंदे सोडून सदर दुरुस्तीसाठी संबधितांच्या कार्यालयाच्या पायºया झिजविण्याचे काम लागले आहे. या संदर्भात निसर्ग युवा मित्रमंडळ व निसर्गमित्र युवा बहूउद्देशिय संस्थेच्यावतीने जिल्हाधिकाºयांसह संबधितांकडे पाठपुरावाही करण्यात आला होता मात्र त्याची अद्याप दखल घेण्यात आली नाही.
मागील तीन ते चार वषार्पासून जिल्हयात सतत दुष्काळग्रस्त वातावरण होते. या दुष्काळग्रस्त शेतक-यांंचा सातबारा, आठ अ व फेरफारमध्ये क्षेत्रफळ कमी होणे व नविन नावे समाविष्ट झाले आहेत. यासह कुळाचे भोगवटदार वर्ग मध्ये नाव टाकणे गरजेचे आहे. मात्र शेतक-यांच्या या महत्वपुर्ण कागदांवर अद्यापही आवश्यक त्या दुरुस्त्या झाल्या नाहीत. त्यामुळे सदर दुरुस्त्यांबाबत आवश्यक ती कार्यवाही होवून अन्यायग्रस्त शेतक-यांना दिलासा देणे गरजेचे झाले आहे.