शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी आमदार रोहित पवारांना धक्का; भाजपाच्या आमदार राम शिंदेंनी मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 12:36 IST

राज्यातील ग्रामपंचायतीचे निकाल आता हळूहळू समोर येत आहे. त्यात काही ठिकाणी शिंदे गटाला विजय मिळत असल्याचं दिसून आले आहे.

कर्जत - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आता हळूहळू समोर येऊ लागले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट, भाजपा विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट यांच्यात प्रतिष्ठेची लढाई आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघातील ग्रामपंचायतीचे निकाल समोर आले आहेत. त्यात रोहित पवारांना मोठा धक्का बसला आहे. 

अलीकडेच राम शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर झालेल्या त्यांच्या मतदारसंघातील ग्रामपंचायतीत राम शिंदे गटाने वर्चस्व राखलं आहे. कर्जत तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायती राम शिंदे यांच्याकडे आल्या आहेत. कोरेगाव येथे १३ पैकी ७, बजरंगवाडी येथे ७ पैकी ५, कुळधरण येथे १३ पैकी ७ जागांवर राम शिंदे गटाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. त्यामुळे या निकालाने स्थानिक आमदार रोहित पवार यांना धक्का बसला आहे. 

राज्यात एकनाथ शिंदे गटाची विजयी वाटचालऔरंगाबाद येथील अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात असलेल्या ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने वर्चस्व राखलं आहे. याठिकाणी ३ पैकी २ ग्रामपंचायतीत शिंदे गटाची सत्ता आली आहे. नानेगाव आणि जंजाळ ग्रामपंचायतीत शिंदे गटाने विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे सातारा येथे शिंदे गटाने पहिली ग्रामपंचायत जिंकली आहे. शिंदे गटाचे आमदार शंभुराज देसाई यांच्या मतदारसंघात उत्तर तांबवे येथे देसाई पॅनेल विजयी झाले आहे. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीत २२ वर्षानंतर सत्तांतर घडलं आहे. पैठण तालुक्यात ७ पैकी ६ ग्रामपंचायतीत शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे. शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्या पॅनेलचा दणदणीत विजय झाल्याचं दिसून येत आहे. अपेगाव, खेर्डा, नानेगाव, शेवता, अनरनांदर, गावंतांडा या ग्रामपंचायती शिंदे गटाच्या ताब्यात आल्या आहेत.

उद्धव ठाकरे गटाला मिळालं यशशिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पहिल्याच निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला बोलबाला पाहायला मिळाला आहे. चिंचपूरच्या या निकालामुळे भाजपाचे नेते आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांना मोठा धक्का मानला जात आहे. सोलापूरात देशमुख यांचे वर्चस्व आहे. मात्र चिचंपूरमधील ग्रामपंचायतीच्या निकालाने उद्धव ठाकरे गटाने बाजी मारत भाजपाला चितपट केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ९ तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीचे निकाल लागणार आहेत. यात पहिला निकाल चिंचपूर ग्रामपंचायतीचा लागला असून शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे ७ पैकी ७ सदस्य निवडून आल्यानं कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारRam Shindeराम शिंदेShiv Senaशिवसेना