शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या मागे 'ईडी' पाठोपाठ ‘सीव्हीसी’चाही ससेमिरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 07:02 IST

शरद पवार, अजित पवारांसह शिखर बँकेतील तत्कालीन संचालकांविरोधात चौकशी करण्याचे नाबार्डला आदेश

- सुकृत करंदीकरपुणे : राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालकांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. मात्र हे प्रकरण तेवढ्यावर थांबणारे नाही. केंद्रीय दक्षता आयोगानेही (सीव्हीसी) शरद पवार यांच्यासह अजित पवार आणि शिखर बँकेतील तत्कालीन संचालकांविरोधात चौकशी करण्याचे आदेश नाबार्डला दिल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी साखर कारखान्यांच्या विक्रीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार काही वर्षांपूर्वी ‘सीव्हीसी’कडे केली होती.सुमारे २० सहकारी साखर कारखान्यांची यंत्रसामुग्री आणि मालमत्तेची विक्री त्याच्या मूळ किंमतीपेक्षा कमी किमतीत केल्याचा आरोप आहे. शिखर बँकेकडे येणारी कर्ज प्रकरणे मंजूर करण्यासाठी २ ते ६ टक्के दलाली घेतली जात असे, असाही आरोप आहे.सूत्रांनी सांगितले, मुळात १२० कोटी रुपये किमतीचा कारखाना ५० कोटीला विकला असेल आणि तेवढ्या रकमेतूनही शिखर बँकेची कर्जवसुली पूर्ण झाली असेल तर त्या स्थितीत इतरांना आरोप करण्याचा अधिकार उरत नाही. ‘आमचे आर्थिक नुकसान झाले,’ असे म्हणत संबंधित कारखाना तक्रारदार व्हावा लागतो. मात्र, असे घडल्याची उदाहरणे नाहीत. सहकारी साखर कारखान्यांचे संचालक मंडळ आणि शिखर बँक यांच्या संगनमतानेच हे प्रकार घडल्याचे सांगितले जाते.राजू शेट्टी यांनी केली होती तक्रारसाखर कारखान्यांच्या बेकायदा विक्रीप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात १९ ऑक्टोबर २०१६ रोजी तक्रार दिली होती. राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळासह विविध तत्कालीन संचालक अशा ८९ जणांची नावे त्यात देण्यात आली होती. दरम्यान, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना आणि शिखर बँक पूर्णत: अजित पवार यांच्या अधिपत्याखाली असताना २००९ ते २०११ या दरम्यान २५ हजार कोटींचा कथित घोटाळा घडल्याची तक्रार आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय