शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

सेवा क्षेत्राने केली उत्पादन-कृषीवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 3:50 AM

उत्पादन क्षेत्रापेक्षा तुलनेने कमी रोजगार असलेल्या सेवा क्षेत्राचा विस्तार वेगाने होत आहे. याबाबत चिंता व्यक्त होत असतानाच महाराष्ट्रातील सेवा क्षेत्र देशापेक्षाही जलद वेगाने वाढत आहे. या वेगाने उत्पादन व कृषी क्षेत्रावरही मात केल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात समोर आले आहे.

मुंबई - उत्पादन क्षेत्रापेक्षा तुलनेने कमी रोजगार असलेल्या सेवा क्षेत्राचा विस्तार वेगाने होत आहे. याबाबत चिंता व्यक्त होत असतानाच महाराष्ट्रातील सेवा क्षेत्र देशापेक्षाही जलद वेगाने वाढत आहे. या वेगाने उत्पादन व कृषी क्षेत्रावरही मात केल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात समोर आले आहे.कुठल्याही उद्योगातील सर्वाधिक रोेजगार हा उत्पादन क्षेत्रात असतो. उत्पादन क्षेत्र हे कमी शिक्षितांनाही रोजगार देत असल्यानेच ते सर्वसमावेशक मानले जाते. त्या तुलनेत सेवा क्षेत्रातील रोजगार हा सहसा शिक्षित व त्यामुळेच मर्यादित असतो. अशावेळी महाराष्टÑ मात्र सेवा क्षेत्रात देशाच्याही पुढे राहिला आहे.राज्याच्या जीडीपीत सेवा क्षेत्राचा वाटा हा ५४.५ टक्के आहे. कृषी व संलग्न क्षेत्राचा राज्याच्या जीडीपीतील वाटा फक्त ११.९ टक्के आहे. हेच प्रमाण देश पातळीवर १७.९ टक्के आहे. केवळ उत्पादन क्षेत्रात महाराष्टÑाची कामगिरी देशापेक्षा थोडी चांगली असल्याचे दिसून येते.उत्पादनातील वाढ कायम : सीआयआययेत्या काळात सेवा क्षेत्रच वेगाने बहरेल. राज्य सरकारदेखील सेवा क्षेत्राच्या वाढीसाठी प्रयत्नरत असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कनव्हर्जन्स’ परिषदेत व्यक्त केले होते. त्यानंतर आता आर्थिक पाहणी अहवालातही हे चित्र स्पष्ट झाले. तसे असले तरी उत्पादन क्षेत्रातील वाढ कायम असेल. गुंतवणूकदारांना उत्पादन क्षेत्रातच रस आहे, असे सीआयआयच्या पश्चिम क्षेत्राचे प्रमुख निनाद करपे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना स्पष्ट केले.जीडीपीतील वाटाक्षेत्र राज्य देशसेवा ५४.५ ५१.७उद्योग ३३.६ ३०.४कृषीव संलग्न ११.९ १७.९

टॅग्स :Maharashtra Budget 2018महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१८Maharashtraमहाराष्ट्र