महाराष्ट्रात २१ हत्या करणारा सिरीअल किलर गजाआड
By Admin | Updated: July 3, 2014 13:30 IST2014-07-03T12:37:00+5:302014-07-03T13:30:35+5:30
महाराष्ट्रात तब्बल २१ हत्या करणारा क्रूरकर्मा तब्बल ३६ वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. चंद्रकांत शर्मा असे या आरोपीचे नाव आहे.

महाराष्ट्रात २१ हत्या करणारा सिरीअल किलर गजाआड
>ऑनलाइन टीम
बंगळुरु, दि. ३- महाराष्ट्रात तब्बल २१ हत्या करणारा क्रूरकर्मा तब्बल ३६ वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. चंद्रकांत शर्मा असे या आरोपीचे नाव असून त्याला बंगळुरु पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली आणि पोलिस चौकशीत त्याने राज्यातील २१ हत्यांची कबूली दिली.
बंगळुरुत घरमालकाची हत्या केल्याप्रकरणी चंद्रकांत शर्मा, त्याची पत्नी आणि दोन मुलांना बंगळुरु पोलिसांनी अटक केली आहे. या हत्येची चौकशी करताना शर्माने महाराष्ट्रात २१ जणांची हत्या केल्याची कबूली पोलिसांना दिली आहे. चंद्रकात शर्मा १९८५ मध्ये बंगळुरुत स्थलांतरित झाला होता. त्यापूर्वी तो महाराष्ट्रात वास्तव्याला होता. शर्माने १९७८ ते १९८१ दरम्यान महाराष्ट्रात २१ जणांची हत्या केली. यातील बहुसंख्य हत्या त्याने पुण्यात केल्याची कबूली दिली. शर्माच्या कबूलीनंतर बंगळुरु पोलिसांचे पथक महाराष्ट्रात आले होते. मात्र त्या सर्व हत्यांची फाईल नष्ट झाल्या होत्या आणि चंद्रकांत शर्माचा रेकॉर्डही महाराष्ट्रात उपलब्ध नव्हता अशी माहिती बंगळुरुतील वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी दिली. चोरीच्या उद्देशानेच त्याने या हत्या केल्या होत्या. दुबईतील एका सोने तस्कराचीही हत्या केल्याचे शर्माने पोलिसांना सांगितले आहे.