शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

१५ सप्टेंबरला १ लाख बँक कर्मचारी संसदेवर धडकणार, बँक विलीनीकरणाला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 20:16 IST

सार्वजनिक बँकांचे विलीनीकरण आणि खासगीकरणाला विरोध करत युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने १५ सप्टेंबरला संसद भवनावर धडक मोर्चाची हाक दिली आहे. रामलीला मैदान ते संसद भवन असा सुमारे एक लाख बँक कर्मचारी व अधिका-यांचा भव्य मोर्चा काढणार असल्याचा दावाही फोरमने केला आहे.

मुंबई, दि. 8 - सार्वजनिक बँकांचे विलीनीकरण आणि खासगीकरणाला विरोध करत युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने १५ सप्टेंबरला संसद भवनावर धडक मोर्चाची हाक दिली आहे. रामलीला मैदान ते संसद भवन असा सुमारे एक लाख बँक कर्मचारी व अधिका-यांचा भव्य मोर्चा काढणार असल्याचा दावाही फोरमने केला आहे.रामलीला मैदानावरून सकाळी १० वाजता सुरू होणा-या मोर्चाचे संसद भवन मार्गावर आल्यावर भव्य सभेत रूपांतर होईल. शासनाने प्रस्तावित केलेल्याखासगीकरण व बँकांच्या विलीनीकरणाच्या धोरणाच्या विरोधात हा मोर्चा काढणार असल्याचे फोरमने सांगितले. जगभरात बँक खासगीकरणाचा प्रयत्न अपयशी ठरलेला असून बँकांची विलीनीकरण रद्द केली जात आहेत. देशात मात्र याउलट परिस्थिती दिसत आहे. सामान्य माणसाच्या घामाच्या पैशाची बचत केलेले १०० लाख कोटी रुपये आज सर्व सरकारी बँकांत सुरक्षित आहेत. मात्र बँकांचे खासगीकरण झाल्यास सर्व बचतीची सूत्रे आजवर ७ लाख कोटी रुपयांची कर्जे थकवून त्या बचतीचा अपहार केलेल्या भांडवलदारांच्या हाती जाण्याची भीती फोरमने व्यक्त केली आहे.फोरमने केलेल्या दाव्यानुसार, सरकारकडे केलेल्या मागण्यांपैकी एकही मागणी कर्मचारी आर्थिक लाभ विषयक किंवा वेतन सुधारणाबाबत नाही. तरीही २२ आॅगस्टला पुकारलेल्या संपात कर्मचारी वर्गाने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला होता. सर्व सामान्य नागरिकांच्या हितरक्षणाच्या लढाईत उतरलेला बँककर्मचारी अधिकारी वर्ग देशभक्तीच्या भावनेने प्रेरित झालेला आहे..............................बँक कर्मचा-यांच्या मागण्या काय?थकीत कर्ज बुडव्या कंपन्यांवर कडक कारवाई करावी.सरकारने कर्ज बुडव्यांची यादी जाहीर करावी.भारतीय दंड संहितेत बदल करून कर्ज बुडवणे हा गुन्हा ठरवावा.निवडणूक कायद्यात योग्य बदल करून कर्ज बुडव्यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवावे.कर्ज बुडव्या कंपन्यांचे उत्तरदायित्व निश्चित करणारी नियमावली करावी...........................................आॅक्टोबर अखेरीस दोन दिवसांचा संपबचत ठेवींवरील व्याजदरात केलेल्या  कपातीचा व वाढवलेल्या सेवाशुल्काच्या दराचा फोरममधील सर्व संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. कंपन्यांच्या कर्ज बुडवेगिरीमुळे झालेले नुकसान सर्व सामान्य जनतेच्या पैशातून वसूल करण्याचा शासनाचा प्रयत्न चुकीचा आहे. तरी सर्व संघटना आपल्या मागण्यांचापाठपुरावा करण्यासाठी आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस दोन दिवसांचा संप करण्याचे देखील ठरवीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.