रिझव्र्ह बँकेच्या भेटीमुळे सेन्सेक्स नव्या उंचीवर

By Admin | Updated: June 3, 2014 23:12 IST2014-06-03T23:12:08+5:302014-06-03T23:12:08+5:30

रिझव्र्ह बँकेने पतधोरण आढाव्यात अर्थव्यवस्थेला संजीवनी देणारी गंगाजळी उपलब्ध करून दिल्यामुळे भारतीय शेअर बाजारांनी आज उसळी घेतली.

The Sensex New Highs Since the Reserve Bank Visit | रिझव्र्ह बँकेच्या भेटीमुळे सेन्सेक्स नव्या उंचीवर

रिझव्र्ह बँकेच्या भेटीमुळे सेन्सेक्स नव्या उंचीवर

>मुंबई : रिझव्र्ह बँकेने पतधोरण आढाव्यात अर्थव्यवस्थेला संजीवनी देणारी गंगाजळी उपलब्ध करून दिल्यामुळे भारतीय शेअर बाजारांनी आज उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तसेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी सार्वकालिक उंचीवर बंद झाले. आजच्या तेजीचा धातू, तेल आणि गॅस तसेच ऊर्जा क्षेत्रला लाभ झाला. 
30 कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश असलेला सेन्सेक्स 173.74 अंकांनी वाढला. ही वाढ 0.70 टक्के आहे. या वाढीसह सेन्सेक्स 24,858.59 अंकांवर बंद झाला. ही सेन्सेक्सच्या इतिहासातील आजर्पयतची सर्वोच्च बंद पातळी आहे. या आधी 26 मे रोजी सेन्सेक्स 24,716.88 अंकांवर बंद झाला होता. हा उच्चंक आज मोडला गेला. त्याबरोबर सेन्सेक्स आता 25 हजार अंकांच्या उंबरठय़ावर उभा आहे. आणखी 142 अंकांची वाढ झाल्यास सेन्सेक्स 25 हजारांच्या आकडय़ाला स्पर्श करील. 
दुसरीकडे चीनच्या फॅक्टरी आणि सेवा क्षेत्रने मे महिन्यात उत्तम कामगिरी केल्याची माहिती एका सव्र्हेमधून समोर आली आहे. या बातमीला धातू क्षेत्रतील कंपन्यांच्या शेअर्सने प्रतिसाद देत वाढ नोंदविली. टाटा स्टीलसह अनेक स्टील कंपन्यांच्या शेअर्सने उत्तम कामगिरी केली. टाटाचा शेअर सर्वाधिक 6.69 टक्क्यांनी वाढला. त्यापाठोपाठ सेसा स्टर्लाईटला 6.53 टक्क्यांची वाढ मिळाली. 
तेल क्षेत्रतील मोठी कंपनी ओएनजीसीच्या शेअर्समध्ये 4.40 टक्क्यांची वाढ झाली. रिलायन्स इंडस्ट्रीचे शेअर्स 1.15 टक्क्यांनी वाढले. या प्रमुख कंपन्यांच्या जोरावर सेन्सेक्स सलग दुस:या दिवशी तेजीत राहिला. सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या 30 कंपन्यांपैकी 17 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. 
बँकिंग क्षेत्रतील शेअर्समध्ये संमिश्र कल पाहायला मिळाला. एसबीआय, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक या बँकांचे शेअर्स घसरले. नफा वसुली फटका या बँकांना बसला. दुस:या बाजूने एचडीएफसी बँक आणि येस बँकेच्या शेअर्सनी मात्र चांगली कामगिरी 
केली. 
बीएसई धातू निर्देशांक सर्वाधिक 5.06 टक्क्यांनी वर चढून 13,155.30 अंकांवर बंद झाला. त्यापाठोपाठ रिअल्टी निर्देशांकाने 3.15 टक्क्यांची वाढ नोंदवून 1,981.79 अंकांचा टप्पा गाठला. सार्वजनिक क्षेत्रतील निर्देशांकाने 1.87 टक्क्यांची वाढ नोंदवून 8,486.21 अंकांचा बंद दिला. तेल आणि वायू क्षेत्रतील निर्देशांक 1.76 टक्क्यांनी वाढून 11,359.50 अंकांवर बंद झाला. 
जागतिक बाजारात संमिश्र कल पाहायला मिळाला. हाँगकाँग आणि जपानच्या बाजारात तेजी होती. हाँगकाँगचा बाजार 0.91 टक्क्यांनी, तर जपानचा बाजार 0.66 टक्क्यांनी वाढला. युरोपीय बाजार मात्र सकाळी 0.33 टक्क्यांनी डाऊन होते. (प्रतिनिधी)
 
4रिझव्र्ह बँकेने आज बाजाराकडून व्यक्त झालेल्या अपेक्षेप्रमाणो धोरणात्मक व्याजदरांत कोणताही बदल केला नाही. त्याचबरोबर सीआरआर कायम ठेवला. एसएलआरमध्ये मात्र 0.50 टक्क्यांची कपात केली. एसएलआरचे प्रमाण आता 22.5 टक्के राहील. रिझव्र्ह बँकेच्या या धोरणाला शेअर बाजाराने तात्काळ प्रतिसाद देत तेजी नोंदविली आहे. 
 
450 कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश असलेला नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी 7,367.10 अंकांवर बंद झाला. आजच्या तेजीत निफ्टीने 53.35 अंकांची कमाई केली. ही वाढ 0.72 टक्क्याची आहे. 

Web Title: The Sensex New Highs Since the Reserve Bank Visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.