शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर व ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2017 11:51 AM

राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना तर संगीताचार्य अण्णासाहेबकिर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा

मुंबई:  राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना तर संगीताचार्य अण्णासाहेबकिर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनीआज केली. 

रूपये ५ लाख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप आहे. आज ५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने ही घोषणा करण्यात आली. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्याअध्यक्षतेखालील निवड समितीत सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधानसचिव नितीन गद्रे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष  मोहन जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर तसेच  फैय्याज, जनार्दन लवंगारे,  रवींद्र लाखे, निर्मिती सावंत, अरुण नलावडे,  राजन ताम्हाणे आणि डॉ. वंदना घांगुर्डे हे सदस्य आहेत.बाबा पार्सेकर हे मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नेपथ्यकारआहेत. हौशी, प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा रंगभूमीच्यातिन्ही धारांमध्ये बाबांनी लखलखीत कामगिरी केली आहे.जे.जे.कला महाविद्यालयातून ॲप्लाईड आर्टची पदवी घेणाऱ्या बाबापार्सेकरांना पहिलेच गुरु भेटले ते प्रसिध्द नाट्यदिग्दर्शक दामू केंकरे.त्यांच्याबरोबर राहून बाबा भारतीय विद्या भवनाच्या एकांकिकांना नेपथ्य करु लागले. विजया मेहता या दुसऱ्या गुरु तिथे त्यांनालाभल्या. ललितकला साधना संस्थेतून त्यांनी व्यावसायिकरंगभूमीवर नेपथ्यकार म्हणून पदार्पण केले. सुरेश खरेंच्या सागरमाझा प्राण या नाटकाचे वैशिष्टयपूर्ण नेपथ्य बाबांचे होते. आजवर ४८५ नाटकांचे नेपथ्य त्यांनी केले आहे.निर्मला गोगटे यांचा जन्म मुंबईचा असून पं. कृष्णरावचोणकर, प्रो.बी.आर. देवधर यांचेकडून आवाज साधना शास्त्राचेविशेष मार्गदर्शन त्यांना मिळाले आहे. सुरुवातीच्या काळात महिलाकलासंगम या स्त्रियांच्या संगीत नाटकातून नायिकेच्या भूमिकात्यांनी केल्या. साहित्य संघ मंदिर, मुंबई या संस्थेमार्फत व्यावसायिकरंगभूमीवर मा. दामले, सुरेशहळदणकर, प्रसाद सावकार,नानासाहेब फाटक, राम मराठे, रामदास कामत, छोटा गंधर्व, दाजीभाटवडेकर यांसारख्या नामवंत कलाकारांसमवेत काम करण्याचीसंधी त्यांना मिळाली. व्यावसायिक रंगभूमीबरोबरच त्यांनी अनेकसंस्कृत नाटकांतही भूमिका केल्या. भारतात तसेच परदेशातआकाशवाणी व दूरदर्शनवर गायनाचे कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. या दोन्ही ज्येष्ठ कलावंतांना हे पुरस्कार येत्या २० नोव्हेंबर२०१७ रोजी बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर /येथे समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहेत.नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार यापूर्वीश्री. प्रभाकर पणशीकर, विजया मेहता, भालचंद्रपेंढारकर, प्रा. मधुकर तोरडमल,  सुलभा देशपांडे, सुधा करमरकर, आत्माराम भेंडे, अरुण काकडे, श्रीकांत मोघे, रामकृष्ण नायक आणि लीलाधरकांबळी यांना प्रदान करण्यात आला आहे.संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी फैय्याज,प्रसाद सावकार,जयमाला शिलेदार,  अरविंद पिळगावकर, रामदासकामत, कीर्ती शिलेदार, रजनी जोशी आणि चंद्रकांतउर्फ चंदू डेगवेकर यांना प्रदान करण्यात आला आहे.