ज्येष्ठांनो बाजूला व्हा, तरुणांना संधी द्या; विधानपरिषद निवडणुकीतील पराभवानंतर पवारांचे वक्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 14:32 IST2018-06-12T14:30:57+5:302018-06-12T14:32:58+5:30
याची सुरुवात मी स्वत:पासून करणार आहे.

ज्येष्ठांनो बाजूला व्हा, तरुणांना संधी द्या; विधानपरिषद निवडणुकीतील पराभवानंतर पवारांचे वक्तव्य
पंढरपूर: बीड-उस्मानाबाद-लातूर विधानपरिषद निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी आमच्यापेक्षा जास्त ताकद लावल्यामुळेच त्यांचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली. ते मंगळवारी पंढरपूरातील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांना विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाविषयी छेडण्यात आले. तेव्हा पवार यांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीत आमच्यापेक्षा जास्त ताकद लावल्याने भाजपाला विजय मिळाला. हे पाहता ज्येष्ठ नेत्यांऐवजी तरूण पिढीला संधी देण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही गरज ओळखून आता पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी तरुण रक्ताला वाव द्यायला पाहिजे. याची सुरुवात मी स्वत:पासून करणार असल्याचे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केले.