शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना 'हे' एकमेव काम उरलं आहे : देंवेंद्र फडवणीस यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 13:36 IST

राज्याचा नाकर्तेपणा समोर येत आहे. आमचा दौरा घोषित झाल्यावर सगळे पालक मंत्री जनतेच्या भेटीला गेले.

ठळक मुद्देबारामतीत अतिवृष्टी पाहणी दौरा सुरु

बारामती: अतिवृष्टीने नुकसान झालेल्या परिस्थितीत राज्य सरकार काय करणार आहे हे स्पष्ट सांगावे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना टोलवाटोलवी नको आहे. राज्य शासनाचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी सरकारचा बचाव करण्याचं एकमेव काम ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उरलं आहे, असा टोला राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

बारामती तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचा विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडवणीस यांचा पाहणी दौरा सोमवारी(दि १९) १०.१५ वाजता सुरु झाला. सुरवातीला फडवणीस यांनी जिरायती भागातील उंडवडी. क.प. येथे भेट देत पाहणी केली. सकाळी १० वाजता येथील विमानतळावर खासगी विमानाने फडवणीस यांचे आगमन झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना फडवणीस यांनी हा टोला लगावला. तुळजापूर येथे ज्येष्ठ नेते पवार यांनी मुख्यमंत्री घरातून का काम करतात,असा पत्रकारांशी प्रश्न केला .त्यावर एकाच ठिकाणी थांबुन काम करण्यासाठी आम्हीच त्यांना विनंती केल्याचे पवार यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर फडवणीस यांनी पत्रक़ारांशी बोलताना ज्येष्ठ नेते पवार यांना हा टोला लगावला.

फडणवीस म्हणाले, राज्याचा नाकर्तेपणा समोर येत आहे. आमचा दौरा घोषित झाल्यावर सगळे पालक मंत्री जनतेच्या भेटीला गेले.शेतकरी एवढ्या गंभीर परिस्थितीमध्ये आहे. सरकारने प्रथम शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे. तुमचे राज्यपालांसोबत जे काही मतभेद असतील ते चालत राहतील.  राज्यपालांबरोबर यापूवीर्ही मतभेद झालेत. त्यामुळे आता तो विषय नाही.  शेतकऱ्याला काय मदत मिळणार ,असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.  केंद्राची वाट न बघता राज्यानं मदत करावी,असा सल्ला देखील त्यांनी दिला.

दरम्यान बारामती येथे आमदार गोपिचंद पडळकर, राहुल कुल,जयकुमार गोरे यांच्यासह  बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे,प्रशांत सातव, पांडुरंग कचरे, अविनाश मोटे, गोविंद देवकाते,माऊली चवरे,गजानन वाकसे ,सतीश फाळके आदींनी फडवणीस यांचे स्वागत केले.यावेळी  फडवणीस साहेब  तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा विजय असो,या घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या. दरम्यान बारामती येथील दौऱ्यानंतर फडणवीस  दौंड , इंदापूर येथील पाहणी दौऱ्यावर रवाना झाले .—————————————————

टॅग्स :BaramatiबारामतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारण