शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांपूर्वी लग्न, बुलेटवरुन पुलावर आले अन्... कृषी खात्‍यातील वरिष्ठ लिपिकाची गोदावरीत मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 16:11 IST

प्रवरा संगम येथील गोदावरी नदीत उडी मारून नेवासा तालुका कृषी विभागातील वरिष्ठ लिपिकाने आत्महत्या केली.

Nevasa Senior Clerk Death: नेवासा येथील  प्रवरा संगम येथील गोदावरी नदीत उडी मारुन नेवासा तालुक्यातील कृषी विभागातील वरिष्ठ लिपिकाने आत्महत्या केली. जालन्यातील संतोष महाजन बहुरे असे मृताचे नाव आहे. नेवासा येथे कृषी विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. चार महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. शनिवारी सायंकाळी नेवासा फाटा येथील घरातून बेपत्ता झाले होते. याबाबत नातेवाइकांनी रविवारी नेवासा पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. सोमवारी सकाळी ११ वाजता त्यांचा मृतदेह गोदावरी नदीच्या पाण्यावर तरंगताना आढळून आला. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

सोमवारी सकाळी हा सगळा प्रकार उघडकीस आली. जुने कायगगाव नदी पात्रातील पाण्यात मृतदेह तरंगताना नागरिकांना आढळला होता. गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी त्यांच्या मूळ गावातील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, भाऊ, भवजयी, पुतण्या असा मोठा परिवार आहे.

संतोष हे त्यांच्या बुलेटने जुने कायगाव येथील गोदावरी नदीच्या जुन्या पुलावर आले होते. तिथून त्‍यांनी गोदापात्रात उडी घेतली. काही मच्छिमारांनी त्याला पाहिले होते. मात्र वरच्या धरणातून येणाऱ्या पाण्यामुळे संतोष यांला वाचवला आले नाही. सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगून वर आला. चांभारवाडी येथील महाजन बहुरे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्‍यांनी पोटाला चिमटा देऊन मनोज आणि संतोष या दोन्ही भावांना उच्च शिक्षण दिले होते. मनोज हे नंदुरबार येथील शासकीय रुग्णालयात आहे. चार महिन्यांपूर्वीच संतोष यांचे लग्‍न झाले होते. पतीचा मृतदेह पाहून त्यांच्या पत्नीने टाहो फोडला. संतोष यांच्या आत्‍महत्‍येचे कारण अद्यापही समोर आलेलं नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस