सेल्फी क्या बडी बात है ? - एकनाथ खडसे
By Admin | Updated: April 18, 2016 17:48 IST2016-04-18T17:42:54+5:302016-04-18T17:48:23+5:30
दुष्काळग्रस्त भागात सेल्फी काढल्यामुऴे सोशल मिडीयात जोरदार टिकेला सामोरे जाणा-या राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंना साथ देत त्यात काही विशेष नसल्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

सेल्फी क्या बडी बात है ? - एकनाथ खडसे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - दुष्काळग्रस्त भागात सेल्फी काढल्यामुऴे सोशल मिडीयात जोरदार टिकेला सामोरे जाणा-या राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंना साथ देत त्यात काही विशेष नसल्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
पंकजा मुंडे यांच्या सेल्फीबाबत एका पत्रकाराने एकनाथ खडसे यांना विचारले असता, त्यांनी सेल्फी काढणे ही काय मोठी गोष्ट आहे का? आत्ताच एकाने माझा सेल्फी काढला, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती भयावह असताना पंकजा मुंडे यांनी दुष्काळग्रस्त लातूरच्या मांजरा नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू असतानाचा सेल्फी आपल्या ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या सेल्फीमुऴे सोशल मिडीयात पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार टिका होत असून विरोधकांनीही त्यांना याप्रकरणी लक्ष्य केले आहे.
#WATCH: Selfie kya badi baat hai? asks Maharashtra Minister Eknath Khadse on Pankaja Munde selfie in Laturhttps://t.co/qx8Icw12hM
— ANI (@ANI_news) April 18, 2016