शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

कोरोनाविरुद्धच्या लढाईत स्वसंरक्षण हाच एक सोपा उपाय- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 06:22 IST

मुंबई महापालिका वगळून मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका आणि नगरपालिकातील लोकप्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंगळवारी संवाद साधला.

मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढाईत स्वसंरक्षण हाच एक सोपा उपाय आहे. नागरिकांना स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम एक शस्त्र ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबई महापालिका वगळून मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका आणि नगरपालिकातील लोकप्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंगळवारी संवाद साधला.या संवादात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, प्रधान सचिव आरोग्य डॉ.प्रदीप व्यास, प्रधान सचिव नगरविकास महेश पाठक, राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक डॉ. एन.रामस्वामी, ठाण्याचे मनपा आयुक्त बिपीन शर्मा, मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका, नगरपालिकातील लोकप्रतिनिधी, मनपा आयुक्त, मुख्याधिकारी सहभागी झाले होते.मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात १५ सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून प्रत्येक नागरिकाची चौकशी, तपासणी करण्यात येणार आहे, तसेच कोरोनाविरुद्ध लढताना घ्यायची काळजी याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. राज्यातील जनजीवन सुरळीत होत असताना कोरोनाची साखळी तोडणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी कोरोनासोबत जगणे आपल्याला शिकावे लागणार असून, आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे. याबाबत जनतेमध्ये जनजागृती करणे महत्त्वाचे आहे.नगरविकासमंत्री शिंदे म्हणाले, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शेवटचा प्रहार आहे. यातून प्रत्येक कुटुंबापर्यंत जाऊन कोरोनाविरुद्धच्या लढ्यात स्वसंरक्षणाच्या उपाययोजनांचे महत्त्व पटवून देण्यात येईल. सरकारी उपाययोजना, तसेच लोकसहभागातून कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम सर्वांनी मिळून यशस्वी केल्यास, इतर राज्यांसाठी ती अनुकरणीय ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.हा काळ प्रत्येकासाठी ठरणार टर्निंग पॉइंट‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम महत्त्वाची आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी गाफील न राहता शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचे आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून आपले कुटुंब सुरक्षित केल्यास पर्यायाने महाराष्ट्र सुरक्षित होणार आहे. हा काळ प्रत्येकाच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट असून, भविष्यात येणाऱ्या इतर महामारींच्या संकटांसाठी जनतेला तयार करण्याचे काम ही मोहीम करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस