जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहा
By Admin | Updated: February 10, 2015 00:54 IST2015-02-10T00:54:52+5:302015-02-10T00:54:52+5:30
जीवन हे एखाद्या नाण्यासारखे असते. एका बाजूने काहीतरी तुमच्या वाटेला आलेले असते, तर दुसरी बाजू कोरी असते. मात्र जे वाट्याला आले त्याचा विचार करून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने

जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहा
सचिनचा चाहत्यांना सल्ला : मनोहरभाई पटेल जयंती समारंभात विद्यार्थ्यांचा गौरव
मनोज ताजने - गोंदिया
जीवन हे एखाद्या नाण्यासारखे असते. एका बाजूने काहीतरी तुमच्या वाटेला आलेले असते, तर दुसरी बाजू कोरी असते. मात्र जे वाट्याला आले त्याचा विचार करून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकले पाहिजे. ईश्वर तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर ‘रिवॉर्ड’ दिल्याशिवाय राहणार नाही, असा मौल्यवान सल्ला मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने गोंदियातील युवा वर्गाला दिला.
शिक्षणमहर्षी मनोहरभाई पटेल यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात सोमवारी (दि.९) गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील विविध अभ्यासक्रमात प्रथम येणाऱ्या १६ गुणवंत विद्यार्थ्यांना सचिनच्या हस्ते सुवर्णपदकांनी गौरविण्यात आले. यावेळी जाहीर प्रकट मुलाखतीदरम्यान सचिनने आपल्या भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री खा. प्रफुल्ल पटेल तर अतिथी म्हणून सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता-दिग्दर्शक राजकुमार हिराणी, डॉ. अंजली तेंडुलकर, मंजित हिराणी, प्रख्यात गीतकार, लेखक व कवी प्रसून जोशी, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, माजी राज्यमंत्री विलासराव शृंगारपवार, नाना पंचबुद्धे, आ.गोपालदास अग्रवाल, रामरतन राऊत, अनिल बावणकर, मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल, स्मृती समितीचे अध्यक्ष माजी आमदार हरिहरभाई पटेल आदी मंचावर विराजमान होते.
यावेळी झालेल्या मुलाखतीत सचिनने देशाच्या प्रगतीसाठी ‘स्वच्छ आणि स्वस्थ भारत’ ही कल्पना साकारण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. त्यासाठी प्रत्येकाने कार्यक्षम राहण्यासोबतच वर्षातून केवळ एक तास इमानदारीने आवश्यकता असेल तिथे जाऊन स्वच्छता करावी, असे आवाहनही त्याने केले.
यावेळी प्रास्ताविक भाषणात खा. प्रफुल्ल पटेल यांनी आपले वडील मनोहरभाई पटेल यांनी लावलेल्या गोंदिया शिक्षण संस्थेच्या रोपट्याचा कसा वटवृक्ष झाला, हे सांगून सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमाची सोय या दोन्ही जिल्ह्यांत करून दिल्याचे सांगितले. यावेळी इतर पाहुण्यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन आ.राजेंद्र जैन यांनी तर आभार प्रदर्शन नरेश माहेश्वरी यांनी केले.
तब्बल दोन तास चाललेल्या या कार्यक्रमादरम्यान सचिनला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने आलेले त्याचे चाहते मंत्रमुग्ध झाले होते. गोंदिया-भंडाराच नाही तर इतर जिल्ह्यातून आणि जवळच्या मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातूनही चाहते आले होते. सचिनच्या आगमनापासून तर त्याला ऐकण्यापर्यंत त्याच्या चाहत्यांकडून अधूनमधून ‘सचिन... सचिन...’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. बंडूभाऊ सावरबांधे, जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, माजी राज्यमंत्री विलासराव शृंगारपवार, नाना पंचबुद्धे, आ.गोपालदास अग्रवाल, रामरतन राऊत, अनिल बावणकर, मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल, स्मृती समितीचे अध्यक्ष माजी आमदार हरिहरभाई पटेल आदी मंचावर विराजमान होते.
यावेळी झालेल्या मुलाखतीत सचिनने देशाच्या प्रगतीसाठी ‘स्वच्छ आणि स्वस्थ भारत’ ही कल्पना साकारण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. त्यासाठी प्रत्येकाने कार्यक्षम राहण्यासोबतच वर्षातून केवळ एक तास इमानदारीने आवश्यकता असेल तिथे जाऊन स्वच्छता करावी, असे आवाहनही त्याने केले.
यावेळी प्रास्ताविक भाषणात खा. प्रफुल्ल पटेल यांनी आपले वडील मनोहरभाई पटेल यांनी लावलेल्या गोंदिया शिक्षण संस्थेच्या रोपट्याचा कसा वटवृक्ष झाला, हे सांगून सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमाची सोय या दोन्ही जिल्ह्यांत करून दिल्याचे सांगितले. यावेळी इतर पाहुण्यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन आ.राजेंद्र जैन यांनी तर आभार प्रदर्शन नरेश माहेश्वरी यांनी केले.
तब्बल दोन तास चाललेल्या या कार्यक्रमादरम्यान सचिनला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने आलेले त्याचे चाहते मंत्रमुग्ध झाले होते. गोंदिया-भंडाराच नाही तर इतर जिल्ह्यातून आणि जवळच्या मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातूनही चाहते आले होते. सचिनच्या आगमनापासून तर त्याला ऐकण्यापर्यंत त्याच्या चाहत्यांकडून अधूनमधून ‘सचिन... सचिन...’ अशा घोषणा दिल्या जात होत्या.
‘थ्री इडियट’ची शूटिंग गोंदियातच केली असती
यावेळी चित्रपट निर्माता-दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी गोंदियाशी जुळलेल्या आपल्या आठवणी सांगताना माझ्या आईचा जन्म गोंदियातील असून लहानपणी मी येथे खेळलो आहे, असे सांगितले. मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाचा परिसर पाहिल्यानंतर हे ठिकाण चित्रपटाची शूटिंग करण्यासारखे असल्याचे ते म्हणाले. ‘थ्री इडियट’ चित्रपटासाठी हवे तसे कॉलेज मुंबईत सापडले नाही. त्यामुळे बंगलोरला जाऊन शूटिंग करावे लागले. आज गोंदियात आल्यानंतर आपण बंगलोरला विनाकारण गेलो, असे वाटायला लागल्याचे हिराणी म्हणाले.