सुरक्षा रक्षकानेच एटीएम लुटले

By Admin | Updated: May 15, 2016 05:20 IST2016-05-15T05:20:36+5:302016-05-15T05:20:36+5:30

ट बँक आॅफ इंडियाच्या एटीएम मशिनच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकानेच एटीएम मशीन उघडण्याचे पिनकोड चोरून मशिनमधील तब्बल २२ लाख ५५ हजार पाचशेंची रोकड लांबविली

Security guards robbed ATMs | सुरक्षा रक्षकानेच एटीएम लुटले

सुरक्षा रक्षकानेच एटीएम लुटले

पंढरपूर : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएम मशिनच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकानेच एटीएम मशीन उघडण्याचे पिनकोड चोरून मशिनमधील तब्बल २२ लाख ५५ हजार पाचशेंची रोकड लांबविली. नागनाथ बाळू जाडकर (वय २२, रा. भटुंबरे, ता. पंढरपूर) असे त्याचे नाव असून, न्यायालयाने त्याला १७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीकडून ११ लाख ५३ हजार रुपये व पाच तोळे सोने हस्तगत केले आहे. बँकेने पुण्याच्या तज्ज्ञांकडून मशिनची तपासणी केली. मात्र, एमटीएममध्ये बिघाड नव्हता. त्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्या. मात्र, पैसे काढण्याच्या वेळी सुरक्षा रक्षकानेच सीसीटीव्ही बंद केल्याने मशीन खोलल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले नाही, परंतु सुरक्षा रक्षक स्वत:चेच बँक अकाउंट पहाटे चेक करत असताना अनेक फुटेजमध्ये दिसले, शिवाय याच दरम्यान त्याने स्वत:च्या खात्यावर याच बॅँकेत दोन लाख ५३ हजार जमा केले, तर ८० हजारांची एफडी केली, त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला. (प्रतिनिधी)

Web Title: Security guards robbed ATMs