शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात सिद्दिकीवरील गोळीबाराचे रहस्य कायम!

By admin | Updated: December 4, 2014 02:31 IST

चंद्रपुरातील कुख्यात गुन्हेगार व कोळसामाफिया शगीर सिद्दिकी याच्यावर नागपुरात मंगळवारी दुपारी चालत्या कारमध्ये झालेल्या गोळीबाराचे रहस्य

चंद्रपूर/ नागपूर : चंद्रपुरातील कुख्यात गुन्हेगार व कोळसामाफिया शगीर सिद्दिकी याच्यावर नागपुरात मंगळवारी दुपारी चालत्या कारमध्ये झालेल्या गोळीबाराचे रहस्य अजूनही उलगडलेले नाही. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या शगिरच्या साथीदारांकडून कुठलीही ठोस माहिती मिळालेली नाही. नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी शगीरची प्रकृती अजुनही चिंताजनक आहे. दुसरीकडे घग्गुस येथे या गोळीबारासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू आहे. शागिर (३२) हा मुळचा चंद्रपूर जिल्ह्णातील घुग्गुस येथील रहिवासी आहे. हाजी शेख सरवर या मोस्ट वॉन्टेड कोलमाफियाचा तो राईट हॅण्ड मानला जातो. हाजीचा समर्थक हेमंत दियेवार याची दोन वर्षांपूर्वी शेखू गँगने बजाजनगर चौकात गोळ्या झाडून हत्या केली होती. तेव्हापासून शागीरच नागपुरातून कोळसा तस्करी आणि खंडणीचे नेटवर्क नियंत्रित करीत आहे. कोळशाच्या तस्करीतून त्याने खूप पैसा जमविला आहे. पांढराबोडी येथील कुख्यात गुन्हेगार शक्ती मनपिया याला त्याने आपला बॉडीगार्ड म्हणून ठेवले होते. ताजबागचा कुख्यात जाकीर खानसह अनेक गुन्हेगार शागीरसोबत राहत होते. मंगळवारी दुपारी १२.११ वाजता घटनेच्या वेळी सुद्धा त्याचे दोन्ही साथीदार सोबत होते. याप्रकरणी शगिरच्या दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परंतु त्यांच्याकुडून अद्याप कुठलीही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. सिद्धीकी कोळसा खाणीतून कोळसा वाहतूक करण्याचा व्यवसाय करतो. कोळसा खाण क्षेत्रात त्याची दबंगगीरी आहे. कोलमाफियामध्ये वर्चस्व व्हावे यासाठी अनेकवेळा वेकोलि अधिकाऱ्याला धमकी देण्याचे प्रकारही घडले आहे. सिद्धीकीवर घुग्घूस पोलिसात दोन खुनाचे प्रयत्न, एक जीवे मारण्याची धमकी, दोन दंगा, एक शिरपूर पोलिसात तलवारीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दोन वर्ष तो तडीपार होता. (प्रतिनिधी)