CoronaVirus News: अरे बापरे! डिस्चार्ज मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी तरुण पुन्हा पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 09:16 IST2021-06-05T09:16:05+5:302021-06-05T09:16:48+5:30
धारूर आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा उघड

CoronaVirus News: अरे बापरे! डिस्चार्ज मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी तरुण पुन्हा पॉझिटिव्ह
धारूर (जि. बीड) : धारूर येथील कोविड केअर सेंटरमधून सुटी दिलेला तरुण दुसऱ्याच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एका चोरीच्या प्रकारातून हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. यातून धारूर आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा उघड झाला आहे.
धारूर पोलिसांनी गुरुवारी घाटात झालेल्या चोरीच्या घटनेत तीन तरुणांना ताब्यात घेतले होते. त्यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार होते. तत्पूर्वी आरोपींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ज्या तरुणाला कालच कोविड सेंटरमधून सुटी देण्यात आली होती, तोच तरुण कोरोना बाधित निघाला आहे. यामुळे आता आरोग्य विभागाच्या उपचार पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.