शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पडद्यामागून लिहिली जातेय 'ही' पटकथा; राज ठाकरेंसह भाजपावर संजय राऊतांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 11:04 IST

जातीय दंगली घडवायच्या आणि राज्यात, देशात दहशतीचं वातावरण निर्माण करून निवडणुकीला सामोरे जायचे अशी खेळी सुरू आहे असा आरोप राऊतांनी केला.

नाशिक - महाराष्ट्रातला वातावरण बिघडवायचं, दंगली घडवायच्या आणि निवडणुकांना सामोरे जायचे अशी पडद्यामागून पटकथा लिहिली जातेय असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज ठाकरेंसह भाजपावर राऊतांनी निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंना घाबरल्यामुळे या हालचाली सुरु असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरेंना ज्याप्रकारे लोकांचा पाठिंबा मिळतोय हे पाहून भाजपा आणि त्यांचे बगलबच्चे घाबरले आहेत. त्यामुळे जातीय दंगली घडवायच्या आणि राज्यात, देशात दहशतीचं वातावरण निर्माण करून निवडणुकीला सामोरे जायचे. परंतु पडद्यामागची ही पटकथा लोकांसमोर आली आहे. त्यामुळे या पटकथेला जनमानसामध्ये स्थान मिळणार नाही असंही त्यांनी सांगितले आहे. 

रस्ता वेगळा करता आला तर पाहू फडणवीस-ठाकरेंसाठी रस्ता वेगळा करता आला तर पाहू. विधिमंडळात जाण्याचा रस्ता एकच आहे. त्यामुळे या अफवांना अर्थ नाही असं संजय राऊत यांनी सांगत फडणवीस-ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर भाष्य केले आहे. त्याचसोबत शिवसेनेला स्क्रिप्टेड करण्याची गरज नाही. आम्हाला बाहेरून सलीम जावेद लागत नाहीत. आम्ही स्वतंत्र आहोत. आमचा पक्ष आमच्या पायांवर उभा आहे. दुसऱ्याची डोकी आम्हाला लागत नाही असं सांगत राऊतांनी मनसेवर निशाणा साधला आहे. 

आधी निवृत्ती पत्करा, मग चौकशीला सामोरे जा मंत्री दादा भूसे यांच्या गिरणा एग्रो कंपनीने १७५ कोटी शेतकऱ्यांकडून गोळा केले आणि प्रत्यक्षात दीड कोटी दाखवण्यात आले. दादा भूसेंच्या दाढीला आग लागण्याचं कारण नव्हते. मोठ्या आवेशात ते विधिमंडळात बोलत होते पण त्यांचे पाय खाली थरथरत होते. दाढीला घाम फुटला होता अशा शब्दात संजय राऊतांनी भूसेंना टार्गेट केले. त्याचसोबत मी मालेगावात जात आहे. त्यावेळी तेथील काही शेतकरी मला भेटणार आहे. या प्रकरणाचा तपास व्हावा अशी आमची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या पैशांचा हिशोब आम्ही मागतोय असंही राऊत म्हणाले. २६ मार्च रोजी मालेगाव येथे उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे त्याच्या तयारीसाठी संजय राऊत नाशिक, मालेगाव दौऱ्यावर आहेत. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपा