शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

ऐन गणेशोत्सव काळात सामान्यांच्या खीशाला कात्री; फळे, भाज्या महागल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 07:12 IST

कोरोनामुळे त्रस्त नागरिकांच्या अडचणीत भर

दासगाव : ऐन गणेशोत्सवाच्या काळात फळे आणि भाजीपाल्याचे दर चांगलेच कडाडले आहेत. गेले काही महिने कोरोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊनची स्थिती होती. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र, आजही अनेक उद्योग, व्यापार, व्यवसाय, लघू उद्योग बंद असल्याने अनेक जण घरीच आहेत. अर्थचक्रही कोरोना संक्रमण काळात मंदावल्याने हातात पैसा उरलेला नाही. अशातच किराणा, जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळे यांची आवकही कमी होत असल्याने आणि सतत पडणाऱ्या पावसाचा परिणाम दरावर झाला आहे. यामुळे भाजीपाला आणि फळांचे दर ऐन गणेशोत्सवात कडाडले आहेत. हातात पैसा नसतानाच अनेक जणांनी गणेशोत्सव साधेपणात साजरा करण्याकडे कल दिला असला, तरी घरात लागणारे धान्य, भाजीपाला, पूजेला लागणारी फळे, चांगलीच महागली आहेत.

पूजेला लागणारा केवडाही २० ते २५ रुपये नग, पपनस फळ ६० ते ७० रुपये नग या दराने विकला जात आहे. कोथिंबीर जुडी तब्बल ५० रुपयांवर गेली आहे. गोंडाही बाजारात आवक कमी झाल्याने २०० रुपये किलोने विकला जात आहे. गेले काही दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने बाजारात भाजी येत नसल्याचे भाजीपाला विक्रेत्याने सांगितले, शिवाय येणारी भाजीही अनेकदा लवकर सततच्या पाण्यामुळे कुजत असल्याने हा फटकाही सहन करावा लागत आहे. महाडमध्ये भाजीपाल्याचे आणि फळांचे दर वाढले असले, तरी ग्रामीण भागातून येणारी भाजी मात्र अजून तरी आवाक्यात असल्याने हा भाजीपाला ग्राहकांना आधार ठरत आहे.सततचा पावसामुळे भाजीपाला, फळे आणि फुलांची आवक कमी होत असल्याने दर वाढले आहेत. ऐन गणेशोत्सवात दर वाढल्याने ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. लवकरच दर पूर्वपदावर येतील, अशी आशा आहे. - रज्जाक करबेलकर, भाजी विक्रेता, पोलादपूरभाज्यांचे दरगवार ८०टोमॅटो ५०मटार १२०पावटा ६०कोबी ८०फ्लॉवर ८०मिरची ३०आले १२०कांदापात ३०कोथिंबीर ५०(दर प्रतिकिलो)

टॅग्स :fruitsफळेvegetableभाज्याcorona virusकोरोना वायरस बातम्या