शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
4
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
5
"मुख्यमंत्रिपदावर मी नको होतो म्हणून मला..," फडणवीसांच्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
7
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
8
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
9
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
10
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
11
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
12
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
13
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
14
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
15
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
16
काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
17
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
18
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
19
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
20
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई

गौरवगाथा... ज्येष्ठांनी सुरु केलेल्या विज्ञानप्रसाराच्या '' पंचविशी '' ची 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 13:53 IST

नोकरी व्यवसायातून निवृत्त झाल्यानंतर उर्वरित काळ सुखाने व्यतीत करण्याचे सोडून त्या २५ जणांनी ग्रामीण भागातील शाळांमध्ये विज्ञानप्रसार करण्याचे ठरवले.

ठळक मुद्देनिवृत्तांचा उपक्रम : ग्रामीण भागात विज्ञानप्रसारउपक्रमाची माहिती होऊन त्यांना आसाम, नागालँड, मिझोराम येथून बोलावणेस्वखर्चातून किंवा संस्था, संघटनांकडून देणग्या घेऊन संस्थेचा, उपक्रमांचा खर्च भागवतात.

- राजू इनामदारपुणे: नोकरी व्यवसायातून निवृत्त झाल्यानंतर उर्वरित काळ सुखाने व्यतीत करण्याचे सोडून त्या २५ जणांनी ग्रामीण भागातील शाळांमध्येविज्ञानप्रसार करण्याचे ठरवले. त्या लहानशा रोपट्याचा आता २५ वर्षानंतर वटवृक्ष झाला असून फक्त राज्यातच नाही तर राज्याबाहेरही त्यांनी कामाचा डोंगरच उभा केला आहे.अमेरिकास्थित मधूकर व पुष्पा देशपांडे यांची ही कल्पना. त्यांना विज्ञानाशी संबधित काही सामाजिक काम करण्याची इच्छा होती.

ती त्यांनी भारत दौऱ्यात काही स्नेह्यांजवळ व्यक्त केली. विज्ञानाची पार्श्वभूमी असलेले त्यांचे हे काही स्नेही एकत्र आले व त्यांनी लगेच सुरूवातही केली. देशपांडे दांपत्याने त्यांना ३२ आसने असलेली एक गाडी घेऊन दिली. तिच्यात प्रयोगांचे साहित्य ठेवून त्यांनी भ्रमंती सुरू केली. उद्दीष्ट ठेवले ग्रामीण शाळांचे. इयत्ता ५ पासून ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ते त्यांच्या अभ्यासक्रमातील तसेच अभ्यासाबाहेरचेही विज्ञान प्रयोग करायला लावतात, त्यामागचे वैज्ञानिक तत्व समजावून सांगतात. प्रात्यक्षिके, व्याख्याने घेतात.एका गाडीच्या तीन गाड्या झाल्या. संस्थेचे विज्ञानवाहिनी असे नामकरण झाले. काही व्यक्तींच्या २५ पेक्षा जास्त व्यक्ती झाल्या. शेकडो शाळा व लाखो विद्यार्थी झाले. त्यांच्या या उपक्रमाची माहिती होऊन त्यांना आसाम, नागालँड, मिझोराम येथून बोलावणे आले. रेल्वेने जाऊन त्यांनी तिथेही या उपक्रमाची मुहुर्तमेढ रोवली. अहमदनगर जिल्ह्याच्या श्रोगोंदे तालुक्यातील सुरोडी गावात पाण्याचा दुष्काळ पडला. तिथे बंधारे तुटले होते. ते सगळे या विज्ञानप्रेमींनी गावातीलच लोकांची मदत घेऊन दुरूस्त करून दिले. आज गावात पाणीच पाणी आहे.एकाही उपक्रमासाठी विज्ञानवाहिनीकडून पैसे आकारले जात नाही. सगळेच कार्यकर्ते वैज्ञानिक पार्श्वभूमी असलेले. स्वखर्चातून किंवा संस्था, संघटनांकडून देणग्या घेऊन संस्थेचा, उपक्रमांचा खर्च भागवतात. काही धर्मादाय संस्था उपक्रमाची माहिती मिळताच स्वत: होऊन देणग्या देतात. देशपांडे दांपत्याने दिलेल्या गाडीनंतर आणखी दोन गाडया झाल्या. खर्च वाढतो म्हणून दोन बाद केल्या. आता एक जनरेटर, १० टेबल, आतमध्येच वॉश रूम वगैरे असलेली एकदम अत्याधुनिक अशी एक गाडी आहे. प्रयोगांचे साहित्य आहे. त्यात नवनवीन भर पडत असते. नवे शोध, नवे प्रयोग यांची विद्यार्थ्यांना आवर्जून माहिती दिली जाते.शरद गोडसे संस्थेचे नियोजन, संयोजन, आयोजन असे सर्व काही पाहतात. कोणालाही नावाची हौस नाही. जवळपास २५ जणांचा मोठा ग्रुप आहे. बहुतेकजण निवृत्त झालेले, वयाने साठी सत्तरीच्या पुढचेच. विज्ञानप्रसार हेच त्यांचे ध्येय आहे. त्रास, दगदग होत नाही का असे विचारल्यावर गोडसे म्हणाले, ‘‘तसे असले असते तर मग कोणी एकत्र आलेच नसते. कोणालाही या कामाची दगदग होत नाही. उलट शाळांचा दौरा वगैरे असे असले की उत्साहच येतो.’’गेल्या काही वर्षांपासून विज्ञानवाहिनीने पुण्यात जूनमध्ये ४ दिवसांचे एक विज्ञानशिबिर घेण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठीही ग्रामीण भागातील शाळा त्यांचे विद्यार्थी निवडून पाठवतात. या निवासी शिबिरात विज्ञानविषयक काम करणाऱ्या, संस्थांची भेट, व्याख्याने, प्रयोग असे बरेच काही विद्यार्थ्यांना दिले जाते. दरवर्षी १५० शाळा व हे ४ दिवसांचे निवासी शिबिर असे विज्ञावाहिनी गेली २५ वर्षे न दमता, न थकता करते आहे..

टॅग्स :Puneपुणेscienceविज्ञानStudentविद्यार्थीEducationशिक्षणSchoolशाळा