शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

राज्यातील शाळा दिवाळीपर्यंत बंद, मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षकांची जबाबदारी वाढली

By अतुल कुलकर्णी | Updated: September 19, 2020 06:27 IST

शाळा सुरू केल्या तर काय परिस्थिती निर्माण होईल. कुठे किती सुरक्षितता आहे. याची विस्तृत माहिती अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना दिली.

- अतुल कुलकर्णीमुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यातील सर्व शाळा दिवाळीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ज्येष्ठ मंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे.शाळा सुरू केल्या तर काय परिस्थिती निर्माण होईल. कुठे किती सुरक्षितता आहे. याची विस्तृत माहिती अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना दिली. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ज्या जिल्ह्यात दोन आकडी रुग्ण संख्या होती तेथे आता रुग्णांची संख्या चार आकड्यांवर गेलेली आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्या तर मुलांना याची लागण होईल. मुलांच्या माध्यमातून ही साथ त्यांच्या घरापर्यंत जाईल. हे होऊ द्यायचे नसेल तर शाळा दिवाळीपर्यंत बंद ठेवणे योग्य राहील, असे यावेळी सांगण्यात आले. राज्यातली एकही शाळा क्वारंनटाईनसाठी वापरली जात नाही, तसेच शिक्षकांच्या सेवा देखील मोठ्या प्रमाणावर आता कोरोनासाठी घेणे कमी झाले आहे, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.आॅनलाइन शिक्षण घेण्यावरून यावेळी चर्चा झाली. अनेक भागात नेटवर्कचा प्रश्न आहे. त्यामुळे या शिक्षणाचा फारसा उपयोग होईल असे वाटत नाही, यावर जवळपास सर्व मंत्र्यांचे एकमत झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. मात्र दिवाळीपर्यंत विद्यार्थ्यांना रिकामे बसू न देता त्यांच्याकडून, त्यांच्या वयोगटानुसार, वेगवेगळ्या उपक्रम राबवून घेणे, अभ्यासक्रमांची ओळख कायम ठेवणे, या गोष्टी जाणीवपूर्वक शिक्षकांनी केल्या पाहिजेत.पालकांनी देखील यात हातभार लावला पाहिजे. जेणेकरून विद्यार्थ्यांची अभ्यासाची सवय तुटणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळे शाळा दिवाळीपर्यंत बंद ठेवण्याच्या निर्णयाची अधिकृत घोषणा लवकरच होईल.कोरोनाचा वाढता संसर्ग कमी करण्याचे आव्हानपहिली ते चौथी चेएकूण विद्यार्थी : ७९,३८,५९१पाचवी ते सातवीचेएकूण विद्यार्थी : ५८,८३,५२५आठवी ते दहावीचेएकूण विद्यार्थी : ५६,४९,१४९अकरावी-बारावीचेएक विद्यार्थी : २८,८४,७६८

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण