शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांपासून शाळांना निधीच नाही

By admin | Updated: January 26, 2017 10:35 IST

२५ टक्के प्रवेशाचे शुल्क देण्यातही हात आखडता.

अकोला, दि. २५- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार अधिनियमानुसार, दिलेल्या २५ टक्के शाळा प्रवेशासाठी शासनाकडून शाळांना देय अनुदानाची दोन कोटीपेक्षाही अधिक रक्कम नवीन सत्रातही मिळालेली नाही. राज्यभरात गेल्या चार वर्षांपासून शाळांना निधी मिळालेला नाही. त्यातच नव्याने ही प्रक्रिया न राबवल्यास शाळांची मान्यता रद्द करण्याचा इशाराही शासनाने दिला आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाला शासनाचा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियमातील कलमानुसार दुर्बल, वंचित घटकातील बालकांना विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे. अनुसूचित जाती, जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास, दिव्यांग या वर्गवारीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा खर्च शासनाकडून दिला जातो. त्यानुसार गेल्या वर्षी २0१५-१६ मध्ये प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्काची रक्कम दोन कोटी रुपयांच्या जवळपास आहे. ती शाळांना मिळण्यासाठीचा प्रस्ताव शिक्षण विभागाने शासनाकडे सादर केला. त्यापैकी एक रुपयाही मिळालेला नाही. चालू वर्षातील १ कोटी ६ लाख रुपये जिल्हा परिषदेकडे प्राप्त आहेत. त्याचे वाटप कुठल्याही शाळेला झालेले नाही. हा निधीही अखर्चित आहे, त्यामुळे या शाळांना विद्यार्थ्यांचा खर्च कसा चालवावा, या समस्येने हैराण केले आहे.राज्यभरातील शाळांचे नऊशे कोटी थकीतगेल्या चार वर्षांपासून म्हणजे २0१२-१३ ते २0१५-१६ या वर्षातील प्रवेश शुल्कापोटी शाळांना देय असलेली जवळपास ९00 कोटी रुपये एवढी रक्कम शासनाकडे थकीत आहे. ती मिळण्यासाठी शाळा संचालकांच्या विविध संघटनांनी सातत्याने आंदोलनेही केली. त्यामुळे २0१३-१४ मध्ये मागणीच्या ६६ टक्के, २0१४-१५ मध्ये ५0 टक्के रक्कम शासनाने दिली. त्यातून चार वर्षांचा खर्च भागणे शक्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शासनाने चालू वर्षात २५ टक्के प्रवेश न दिल्यास मान्यता रद्दचा इशारा दिला आहे. ग्रामीण भागातील शाळा बंद होण्याची शक्यताही काहींनी व्यक्त केली.संचालकांच्या संघटनांची २८ ला बैठकदरम्यान, चालू वर्षातील प्रवेश प्रक्रिया शाळांकडून राबवली जाईल; मात्र खर्चाबाबत शासनाकडून काय केले जाणार, याबाबतचा आढावा आणि विचार करण्यासाठी शाळा संचालकांच्या मेस्टा, वेस्टा, इस्टा या संघटनांच्या पदाधिकार्‍यांची २८ जानेवारी रोजी नागपूर येथे बैठक होत आहे. या बैठकीत संघटनांची पुढील भूमिका ठरणार असल्याची माहिती आहे.