शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये विद्यार्थ्याने केली शाळेत आत्महत्या

By admin | Updated: February 25, 2015 02:46 IST

शिक्षिकेने मारहाण केल्यानंतर विद्यार्थ्याने चौथ्या मजल्यावरील वर्गातून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पनवेलमधील न्यू हॉरिझोन पब्लिक स्कूलमध्ये घडली.

पनवेल : शिक्षिकेने मारहाण केल्यानंतर विद्यार्थ्याने चौथ्या मजल्यावरील वर्गातून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पनवेलमधील न्यू हॉरिझोन पब्लिक स्कूलमध्ये घडली. खांदा वसाहतीमधील सेक्टर १३ मधील न्यू हॉरिझोन पब्लिक स्कूलमध्ये मंगळवारी सकाळी सहावी इयत्तेत शिकणाऱ्या गौरव दत्तात्रेय कंक(१२) या विद्यार्थ्याला शिक्षिकेने मारहाण केली होती. त्यामुळे भयभीत झालेल्या गौरवने शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. त्याला येथील अष्टविनायक रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच गौरवच्या नातेवाइकांनी शाळेत धाव घेतली. शाळा प्रशासनाला संबंधित प्रकाराबद्दल जाब विचारला. मात्र शाळेच्या मुख्याध्यापिकेने काहीही बोलण्यास नकार दिला. मुलाच्या मृत्यूस मारहाण करणारी शिक्षिकाच जबाबदार असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या घटनेची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, शाळेवर विद्यार्थ्याच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका व घटनेप्रसंगी वर्गात उपस्थित शिक्षकांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.