नाशिक घोटीमधून शाळकरी मुलाचे अपहरण
By Admin | Updated: August 17, 2016 14:06 IST2016-08-17T14:06:36+5:302016-08-17T14:06:36+5:30
घोटी शहरातील दुर्गानगर (रामरावनगर) परिसरात राहणाऱ्या एका पंधरा वर्षीय शाळकरी मुलाचे शिकवणीला जाताना अज्ञात व्यक्तीने अपहरण केले.

नाशिक घोटीमधून शाळकरी मुलाचे अपहरण
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
घोटी, दि. १७ - नाशिक जिल्ह्यातील घोटी शहरातील दुर्गानगर (रामरावनगर) परिसरात राहणाऱ्या एका पंधरा वर्षीय शाळकरी मुलाचे शिकवणीला जाताना अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे घोटी शहरात पालक वर्गात घबराट पसरली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,घोटीतील रामराम नगर भागातील दुर्गानगर भागात भगवंत मंजू भारमल हे आपल्या कुटुंबासह रहात असे राहतात. त्यांचा उमेश नामक मुलगा घोटीतिल जनता विद्यालयात दहावीत शिकत असून तो स्वतंत्र दिनाच्या दिवशी ध्वजारोहण आटोपल्यानंतर शिकवणीसाठी जात असताना अज्ञात इसमाने त्याला फूस लावून त्याचे अपहरण केले अशी फिर्याद अपह्रत मुलाच्या वडीलाने घोटी पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान घोटी शहरातून दिवसाढवळ्या एका शाळकरी मुलाचे अपहरण झाल्याने घोटीतिल पालक वर्गात घबराट पसरली आहे.
याबाबत घोटी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कमलेश बच्छाव,हवालदार प्रित्तम लोखंडे आदी करीत आहेत.