शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

शाळेची घंटा वाजली! पाचवी ते दहावीचे वर्ग राज्यभरात सुरू; मुंबईत अद्यापही प्रश्नचिन्ह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 07:17 IST

एकीकडे शाळा सुरू करताना संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी त्या-त्या गावांमधील शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खबरदारी घ्यावी, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे

मुंबई : कोरोना महामारीमुळे गेले दहा महिने बंद असलेल्या राज्यातील शाळा बुधवारपासून उघडल्या असून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू झाल्याने शाळेच्या प्रांगणात पुन्हा किलबिलाट ऐकू येऊ लागला. विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असली तरी शाळाशाळांमध्ये गुलाबपुष्प देऊन त्यांचे उत्साहात स्वागत झाले. मात्र मुंबईच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये कधी सुरू हाेणार, याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह कायमच आहे.

हमीपत्र दिलेल्या विद्यार्थ्यांची थर्मल गनने तपासणी करून त्यांना वर्गामध्ये प्रवेश देण्यात आला. दोन सत्रांमध्ये वर्ग भरवले गेले. विद्यार्थ्यांच्या तुकडीनुसार एक दिवसआड त्यांचे वर्ग भरविण्याचे नियोजन आहे. सकाळी अकरा ते दुपारी एक आणि दुपारी तीन ते सायंकाळी पाच यावेळेत बहुतांश शाळांमधील पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग भरले. विद्यार्थी संख्येच्या तुलनेत दोन ते तीन तुकड्या करण्यात आल्या आहेत.

एकीकडे शाळा सुरू करताना संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी त्या-त्या गावांमधील शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खबरदारी घ्यावी, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. शाळेतील प्रत्येक शिक्षक व कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. पाचवी ते आठवीच्या वर्गांसाठी नववी ते बारावीच्या वर्गासाठी ज्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या त्याच लागू असणार असल्याचे आयुक्त विशाल सोळंकी यांनी स्पष्ट केले.

मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशांप्रमाणे त्यांच्या पुढील सूचना येईपर्यंत मुंबईतील शाळा, महाविद्यालये बंद राहणार असल्याने या शाळा कधी सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. शिक्षणमंत्र्यांनी स्वतः याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी पालकांकडून हाेत आहे. 

विद्यार्थी संख्या वाढेल अशी अपेक्षा२३ नोव्हेंबरपासून राज्यात टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आलेल्या शाळांमध्ये आजपर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळले नाहीत, ही समाधानाची बाब आहे. पालक व शाळा यांमधील समन्वयामुळे हे शक्य झाले असून सगळीकडे कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे. येत्या काळात नववी ते बारावीप्रमाणे पाचवी ते आठवीमधील विद्यार्थीसंख्याही वाढेल अशी अपेक्षा आहे. - वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSchoolशाळा