शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

अनुसूचित जाती आरक्षण; उपवर्गीकरणासाठी समिती; निवृत्त न्यायमूर्ती बदर अध्यक्ष, राज्य सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 13:27 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या निबंधक इंदिरा आस्वार या समितीच्या सदस्य सचिव असतील. अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी दिले होते. या उपवर्गीकरणाचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना दिले होते.

मुंबई : अनुसूचित जातींच्या (एस.सी.) आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाचा प्रारूप आराखडा ठरविण्यासाठी पाटणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंगळवारी घेतला. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या निबंधक इंदिरा आस्वार या समितीच्या सदस्य सचिव असतील. अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी दिले होते. या उपवर्गीकरणाचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना दिले होते. त्यानुसार आता महाराष्ट्र सरकारने या उपवर्गीकरणाचे स्वरूप कसे असावे, हे निश्चित करण्यासाठी त्याचा आराखडा तयार करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी न्या. बदर यांच्या अध्यक्षतेखालील समिती राज्य सरकारला अहवाल सादर करेल. 

उपवर्गीकरण म्हणजे अनुसूचित जातींमध्ये ज्या उपजाती मोडतात त्यापैकी कोणत्या उपजातीला आजवर आरक्षणाचा किती फायदा झाला हे समिती अभ्यासाअंती अहवालात नमूद करेल. तसेच अनुसूचित जातींना राज्यात असलेल्या १३ टक्के आरक्षणाची उपजातींनुसार टक्केवारी किती असावी याचीही शिफारस राज्य सरकारला करेल. 

अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करणे हा एकूणच मागासवर्गीय समाजात फूट पाडण्याचा भाजपचा अजेंडा आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णयात काय म्हटले आहे याचा अभ्यास न करता हा अजेंडा समोर ठेवून उपवर्गीकरणासाठी सरकारने समिती नेमली आहे. नवा मनुवाद आणला जात आहे. - नितीन राऊत, माजी मंत्री

आजवर विशिष्ट वर्गालाच अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे लाभ मिळाले. आता उपवर्गीकरणामुळे मागास जातींमध्ये आरक्षणापासून कोण, किती वंचित राहिले ते निश्चित होईल. समिती नेमण्याचा सरकारचा निर्णय अतिशय योग्य आहे. - कॉ. गणपत भिसे, उपवर्गीकरणाचे आंदोलक नेते.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास  सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरणासंदर्भात दिलेल्या निकालाचा समिती अभ्यास करेल. राज्यातील अनुसूचित जातींची सविस्तर यादी तयार करून त्याचाही अभ्यास करेल. काही राज्यांनी असे उपवर्गीकरण आधीच केले आहे, त्याचा समिती अभ्यास करेल. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ च्या निर्णयानंतर काही राज्यांनी उपवर्गीकरणाची प्रक्रिया सुरू केली असेल त्या बाबतही समिती माहिती घेईल.  

टॅग्स :State Governmentराज्य सरकारreservationआरक्षण