शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

शिक्षक नियुक्त्यांमध्ये घोटाळा, चौकशी आयोग नेमण्याची मागणी, शिक्षण संचालकांना दिले निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 06:14 IST

Teacher : राज्यातील स्वयंसेवी संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत शिक्षणतज्ज्ञांनी या शिक्षक भरतीच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी थेट न्यायाधीशांमार्फत चौकशी आयोग स्थापन करण्याची आणि शिक्षक भरतीची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे.

मुंबई : टीईटी परीक्षेतील घोटाळ्यासाठी शालेय शिक्षण विभागातील गैरकारभार चव्हाट्यावर आला असतानाच आता २०१२पासून शिक्षक भरती बंद असताना हजारो शिक्षकांच्या करण्यात आलेल्या नियुक्त्यांमधील घोटाळ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

राज्यातील स्वयंसेवी संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत शिक्षणतज्ज्ञांनी या शिक्षक भरतीच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी थेट न्यायाधीशांमार्फत चौकशी आयोग स्थापन करण्याची आणि शिक्षक भरतीची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे. यासाठी माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांची भेट घेऊन त्यासाठीचे निवेदन देत, तर आयुक्तांशी फोनवर चर्चा करीत यावर कार्यवाही करण्याचा आग्रह धरला आहे.

राज्यातील शेकडो अनुदानित शाळांमध्ये २०१२ नंतर शिक्षक भरती बंद असताना हजारो शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यासाठी संस्थाचालक, शिक्षणाधिकाऱ्यांच्या संगनमताने शिक्षक भरतीचा घोटाळा झाला असून, त्यावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात अनेकदा चर्चा झाल्या. अहवाल तयार झाला. मात्र, अंमलबजावणी झाली नाही. यामुळे हा घोटाळा खूप गंभीर असल्याने याच्या चौकशीसाठी आयोगाची गरज आहे. २०१२ ते २१ या काळातील सर्व नेमणुका तपासण्याची गरज असून, याबाबत सरकारने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून समाजासमोर वास्तव मांडावे, अशी मागणी या शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.

अल्पसंख्याक शाळांतील पदभरती संशयास्पद विनाअनुदानित शाळेतील शिक्षक आत्महत्या करत असताना त्यांची नेमणूक अनुदानित तुकड्यांवर करण्याऐवजी पैसे घेऊन शिक्षकांच्या नेमणुका केल्या. अल्पसंख्याक शाळांमधील भरती ही संशयास्पद आहे. हे सारे बघता आता राज्य सरकारने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. 

राज्यभरात भ्रष्टाचार टीईटी परीक्षा पास करण्याचे पैसे व त्यातून सुटका करून नेमणूक देण्याचेही पैसे असा दुहेरी भ्रष्टाचार राज्याच्या जिल्ह्याजिल्ह्यात झाला आहे. २०१२ पूर्वी शिक्षकांच्या नेमणुका दाखवून खोटे रेकॉर्ड कसे तयार केले. या तपशिलासह या शिक्षकांचे पगार आणि पगारातील फरकही काढून शासनाची कोट्यवधींची  फसवणूक केली आहे.

शिष्टमंडळात कोण ?शिष्टमंडळात हेरंब कुलकर्णी, असीम सरोदे, मुकुंद किर्दत, राजेंद्र धारणकर, विलास किरोते, संजय दाभाडे, वैशाली बाफना, सुरेश साबळे, प्रकाश टेके, विद्यानंद नायक, सतीश यादव होते.

टॅग्स :Teacherशिक्षक