भक्तीमय वातावरणात गणरायाला निरोप
By Admin | Updated: September 9, 2014 06:32 IST2014-09-09T06:32:43+5:302014-09-09T06:32:43+5:30
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, च्या घोषणादेत आज राज्यभरातील जनतेने गणरायाला निरोप दिला.

भक्तीमय वातावरणात गणरायाला निरोप
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, च्या घोषणादेत आज राज्यभरातील जनतेने गणरायाला निरोप दिला. या वर्षी पारंपारीक वाद्यांना अधिक पसंती देण्यात आली. गणरायाला निरोप द्यायला पाऊसही आल्याने तरुणांच्या उत्साहाला उधाण आले होते. मुंबईतील चौपाट्या आणि राज्यभरात मिरवणूकीदरम्यान लेझिम, पारंपारीक नृत्य, लाठीकाठी इत्यादी खेळ खेळण्यात आले. मुंबईतील चौपाट्या आणि राज्यभरातील तलावाच्या काठी आज जनसागर ओसंडून वाहत होता. तसेच राज्यातील काही महत्वाच्या ठिकाणी घातपाती कारवाया होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली होती. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत,ठिकठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. राज्य राखीव पोलिस दलांसह इतर अनेक पोलिस दल कार्यरत होती. चोख पोलिसबंदोबस्तात सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. तसेच गिरगाव चौपाटी येथे विसर्जना दरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील विसर्जनाकरता उपस्थित होते. आपल्या आगमना आधी राज्यभरात समृद्धी नांदावी म्हणून गणरायाने पावसाने जनतेला संतुष्ट केले असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच विसर्जना दरम्या आगामी निवडणूकांबद्दल अभीनेता नाना पाटेकर यांना विचारले असता त्यांनी पक्षांतर करण्यास कायदेशीर बंदी असावी असे मत प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केले.