शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी : बांदा सकेंश्वर महामार्ग सावंतवाडीतूनच जाणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 23:05 IST

लोकमतचे वृत्तच खरे ठरले, अफवांना ब्रेक; माजी आमदार शिवराम दळवींना राष्ट्रीय महामार्ग विभागाचे पत्र.

ठळक मुद्देलोकमतचे वृत्तच खरे ठरले, अफवांना ब्रेकमाजी आमदार शिवराम दळवींना राष्ट्रीय महामार्ग विभागाचे पत्र

अनंत जाधव    सावंतवाडी : महाराष्ट्र व कर्नाटकला जोडणाऱ्या नव्या रेडी संकेश्वर मार्गाऐवजी केंद्राने संकेश्वर-बांदा मागार्ला मंजुरी दिली असून, त्याबाबतचा अद्यादेश ही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून काढण्यात आले होता. मात्र हे वृत्त प्रसिद्ध होताच अनेकांनी अफवा पसरवत हा रस्ता बावळट मार्गे बांद्याला जोडणार असे सर्वत्र पसरवले होते. मात्र आता खुद्द राष्ट्रीय महामार्ग विभागानेच सदरचा रस्ता हा सकेंश्वर बांदा असा असून तो सावंतवाडीतूनच जाणार यावर शिक्कामोर्तब केले आहे. तसे पत्रही या विभागाने माजी आमदार शिवराम दळवी यांना दिल्याने आता अफवांना ब्रेक लागला असून ऑनलाईनने २६ सप्टेंबर २०२० रोजी दिलेलेच वृत्त खरे ठरले आहे.

महाराष्ट्र व कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या नव्या महामागार्ची संकल्पना केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मांडली होती. त्यानंतर रेडीपासून संकेश्वरपर्यंतच्या रस्त्याचे सर्व्हेक्षणही करण्यात आले होते. मात्र नव्या सर्व्हेक्षणात हा रस्ता संकेश्वरवरून रेडीला जोडण्याऐवजी बांद्याला जोडण्याचे निश्चित करण्यात आले होते. कारण कर्नाटकमधील संकेश्वर येथे जंक्शन असून, तसेच बांदा येथे करण्याचे ठरवण्यात आले असून, संकेश्वर व बांदा ही जंक्शन जोडण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन मार्ग संकेश्वर ते बांदा असा करण्यात आला आहे. १०३ किलोमीटरचा असणार आहे.

हा रस्ता कर्नाटकातून संकेश्वरवरून येथून सुरू होणार असून, कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज-आजारा तर सिंधुदुर्ग जिल्हयातील आंबोली-माडखोल-सावंतवाडी-इन्सुलीवरून तो महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या बांद्याला जोडला जाणार आहे. हा महामार्ग एनएच ४८ म्हणून ही निश्चित करण्यात आला असून, तो बांदा येथे एनएच ६६ ला जोडला जाणार आहे. दरम्यान, या प्रस्तावित रस्त्याचा अद्यादेश ही काढण्यात आला त्याच्या सर्व्हेक्षणाचे काम ही अंतिम टप्यात आले असतनाच काहींनी हा रस्ता आंबोलीतून उतरल्यानंतर बावळट येथून बांदा येथे जोडला जाईल अशा प्रकारची अफवा पसरवण्यास सुरूवात केली होती.

मात्र आता याबाबत कोल्हापूर उपविभागीय राष्ट्रीय महामागार्चे उपअभियंता पी.जी.बारटक्के यांनी अधिकृतपणे सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार शिवराम दळवी यांना माहीती दिल्याने आता या रस्त्याच्या अधिकृत मार्गावर शिक्कामोर्तब झाले आहे.लोकमतने सर्वात आधी वृत्त दिले होतेसकेंश्वर बांदा मार्गाबाबत सर्वात प्रथम लोकमतने वृत्त दिले होते. मात्र नंतर काहींनी ही अफवा पसरवत आपल्या पद्धतीने नवनवीन मार्ग निर्माण केले होते. पण आता राष्ट्रीय महामार्ग विभागानेच अद्यादेशासह पत्र जाहीर केल्याने अफवांना ब्रेक लागला आहे.

टॅग्स :Sawantwadiसावंतवाडीkonkanकोकणhighwayमहामार्गNitin Gadkariनितीन गडकरीroad transportरस्ते वाहतूक