शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Savitribai Phule Birth Anniversary: सावित्रीबाई फुलेंच्या 'या' खास गोष्टी जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 14:01 IST

आज भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाज सेविका, कवियित्री असलेल्या सावित्रीबाई ज्‍योतिराव फुले यांची जयंती.

आज भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाज सेविका, कवियित्री असलेल्या सावित्रीबाई ज्‍योतिराव फुले यांची जयंती. 3 जानेवारी 1831 ला साताऱ्यातील नायगाव येथे खंडोजी नेवासे आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी जन्मलेल्या सावित्रीबाईचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाला. ज्योतिबा फुले म्हणजे एक थोर व्यक्तिमत्तव. लग्नापूर्वी काहीही न शिकलेल्या सावित्रीबाईंनी लग्नानंतर एका वर्षातच ज्योतिबांच्या प्रेरणेने शिक्षण्यास सुरुवात केली. जाणून घेऊया आयुष्यभर महिलांना शिक्षण देण्यासाठी आणि समाजासाठी झटत राहिलेल्या सावित्रीबाईँबाबत खास गोष्टी...

- सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी, 1831मध्ये दलित परिवारामध्ये झाला होता. 

- 1840 रोजी वयाच्या नवव्या वर्षी सावित्रीबाईंचा विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत झाला. 

- सावित्रीबाईंनी आपले पती क्रांतिसुर्य ज्योतिराव फुले यांच्यासोबतीने मुलींसाठी 18 शाळा सुरू केल्या. त्यातील पहिली आणि शेवटची शाळा त्यांनी पुण्यातच सुरू केली होती. 

- सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका असून त्या महिला मुक्ती आंदोलनाच्या नेत्या होत्या.

- त्यांनी 28 जानेवारी 1853मध्ये गर्भवती बलात्कार पीडित महिलांसाठी बाल हत्‍या प्रतिबंधक गृहाची स्‍थापना केली. 

- सावित्रीबाईंनी 19व्या शतकात सतीप्रथा, बालविवाह या अनिष्ट प्रथांविरूद्ध बंड पुकारला. तसेच विधवांसाठी एका केंद्राची स्थापना करून त्यांना पुनर्विवाहासाठी प्रोत्साहित करण्याचं काम केलं.

- सावित्रीबाई फुले यांनी आत्महत्या करणाऱ्या विधवा ब्राह्मण महिला काशीबाईंची आपल्या घरामध्ये प्रसुती करून त्यांचा मुलगा यशवंतचा आपला दत्तक पुत्र म्हणून सांभाळ केला. पुढे जाऊन यशवंत शिक्षण घेऊन डॉक्टर झाला. 

- महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मृत्यूनंतर सावित्रीबाईंनी त्यांचं अर्धवट राहिलेलं सामजकार्य पूर्ण करण्याचा निर्धार केला. 

- सावित्रीबाईंचा मृत्यू 10 मार्च 1897 ला प्लेगच्या रूग्णांची सेवा करताना झाला. 

- सावित्रीबाईंनी आपलं संपूर्ण जीवन महिला आणि दलितांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी वेचले. 

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेsocial workerसमाजसेवकTeacherशिक्षकMaharashtraमहाराष्ट्र