जीव वाचवणा:यांचा पडला विसर
By Admin | Updated: November 27, 2014 02:07 IST2014-11-27T02:07:49+5:302014-11-27T02:07:49+5:30
26/11 च्या हल्ल्याप्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून इतरांचा प्राण वाचविणा:या नागरिकांचा शासनाला विसर पडला आहे.

जीव वाचवणा:यांचा पडला विसर
नवी मुंबई : 26/11 च्या हल्ल्याप्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून इतरांचा प्राण वाचविणा:या नागरिकांचा शासनाला विसर पडला आहे. सहा वर्षात अनेकांना साधा पुरस्कारही मिळाला नसल्याची खंत दोन जणांचा जीव वाचविणा:या चंद्रकांत सरनोबत यांनी व्यक्त केली आहे.
सानपाडामधील मिलेनियम टॉवरमध्ये राहणारे चंद्रकांत सरनोबत ओबेरॉय हॉटेलमध्ये फिटनेस ट्रेनर पदावर काम करत आहेत. 26/11 वरील हल्ल्याच्या प्रसंगी ते हॉटेलमध्येच होते. स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांनी कॅनेडियन नागरिक मायकल रूडर व सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे संचालक सी. एम. पुरी यांचा जीव वाचविला होता. या दोघांना रुग्णालयात नेऊन तेथे त्यांची देखभाल केली होती. या दोघांकडील किमती वस्तूंचीही देखभाल केली होती. कॅनेडियन नागरिक मायदेशी गेल्यानंतरही त्यांनी पत्र देऊन आभार मानले होते, तर पुरी यांनीही प्रत्यक्ष भेटून आभार मानले होते. सरनोबत यांचे योगदान फक्त एवढेच नसून या प्रकरणामध्ये पंच म्हणून त्यांनी काम पाहिले होते. छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये पोलिसांसोबत फिरून तेथे सापडलेली मॅगङिान, गोळ्या व इतर वस्तूंचा पंचनामा त्यांच्या सोबत केला होता. महत्त्वाचे साक्षीदार म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी व कर्मचारी, ज्यांनी जिवाची बाजी लावून लढा दिला त्यामधील बहुतांश सर्वाना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. परंतु सरनोबत यांच्याप्रमाणो ज्या नागरिकांनी जीव धोक्यात घालून अनेकांचे जीव वाचविले त्यांच्या वाटय़ाला मात्र उपेक्षाच आली. ओबेरॉय हॉटेलमधील अनेकांनी त्यांच्या परीने योगदान दिले आहे. परंतु अद्याप त्यांची शासनाने काहीही दखल घेतलेली नाही. सरनोबत यांच्या कामाची दखल घ्यावी यासाठी मुंबई जिल्हाधिकारी यांनी ठाणो जिल्हाधिका:यांना यापूर्वीच कळविले होते. पोलिसांकडूनही माहिती मागविली. परंतु अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही. शौर्य गाजविणा:या या नागरिकांना अजून किती दिवस पुरस्कारासाठी वाट पाहावी लागणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
26/11 च्या हल्ल्यामध्ये दोन जणांचे प्राण वाचविले. या खटल्यात पंच म्हणूनही काम केले. देशावरील संकटप्रसंगी अल्पसे योगदान देता आले याचा अभिमान आहे. परंतु माङयाप्रमाणो अनेक नागरिक आहेत, ज्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून मदतकार्य केले त्या सर्वाना सहा वर्षात शासनाने पुरस्कार दिला नाही याची खंत वाटते.
- चंद्रकांत सरनोबत