"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 14:49 IST2025-06-28T14:48:30+5:302025-06-28T14:49:12+5:30

Shefali Jariwala Death : शेफालीच्या अचानक झालेल्या मृत्यूने श्रेयस तळपदेलाही धक्का बसला आहे. यावर विश्वास ठेवणं कठीण असल्याचं अभिनेत्याने म्हटलं आहे.

shefali jariwala death due to heart attack shreyas talpade shared said heartbreaking | "मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का

"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का

Shefali Jariwala Death : अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी(२७ जून) मुंबईत निधन झालं. ४२ वर्षांच्या शेफालीच्या अचानक झालेल्या निधनाने सिनेसृष्टी हादरली आहे. तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. शेफालीच्या निधनानंतर श्रेयस तळपदेने पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे. 

शेफालीच्या अचानक झालेल्या मृत्यूने श्रेयस तळपदेलाही धक्का बसला आहे. यावर विश्वास ठेवणं कठीण असल्याचं अभिनेत्याने म्हटलं आहे. "शेफाली माझा विश्वास बसत नाहीये आणि माझं हृदय तुटलं आहे. तुझ्या कुटुंबीयांना यातून सावरण्यासाठी बळ मिळो. तुझी आठवत येईल", असं म्हणत श्रेयसने श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी श्रेयस तळपदेलाही हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र यातून अभिनेता थोडक्यात बचावला होता. तातडीने उपचार मिळाल्यामुळे श्रेयसच्या जीवावर बेतलं नाही. 


शेफाली जरीवाला 'काटा लगा' गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आली होती. या गाण्याने तिला रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली होती. त्यानंतर अनेक मालिका, सिनेमा आणि वेबसीरिजमध्येही ती दिसली. 'बिग बॉस १३' मध्येही शेफाली सहभागी झाली होती. याशिवाय 'बुगी वुगी', 'नच बलिये' या रिएलिटी शोमध्येही तिने सहभाग घेतला होता. 

Web Title: shefali jariwala death due to heart attack shreyas talpade shared said heartbreaking