शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेने केली १४ कोटी लिटर पाण्याची बचत

By appasaheb.patil | Updated: June 7, 2019 12:42 IST

मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलाचा उपक्रम; दुष्काळात रेल्वेला दिलासा, पुर्नप्रक्रिया करून पुन्हा वापरले पाणी

आप्पासाहेब पाटील 

सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागाने मागील वर्षात दूषित पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून तब्बल १४ कोटी लिटर पाण्याची बचत केली आहे. एवढेच नव्हे तर ७५ हजार झाडे लावून वृक्षसंवर्धनाला गती देण्याचे कामही रेल्वे विभागाने सुरू केल्याची माहिती अप्पर रेल्वे मंडल प्रबंधक व्ही़ के. नागर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

भारतीय रेल हा भारत सरकारचा महत्त्वपूर्ण विभाग आहे़ या विभागातील सोलापूर विभागाने सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात ५ लाख लिटर, दौंड रेल्वे स्टेशनवर ३़५ लाख लिटर व वाडी रेल्वे स्टेशनवर ३़५ लाख लिटर क्षमतेचा पाण्यावर पुनर्प्रक्रिया करणारा प्रोजेक्ट उभा केला आहे़ या प्रोजेक्टच्या माध्यमातून रेल्वेतील वापरण्यात आलेल्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून हे पाणी पुन्हा वापरात आणण्याचे काम सोलापूर विभागाने मागील काही वर्षांपासून सुरू केले आहे़ त्यामुळे आतापर्यंत १४ कोटी लिटर पाण्याची बचत या माध्यमातून झाल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली.

सौरऊर्जेद्वारे १६ हजार युनिट विजेची निर्मिती- आजच्या जीवनामध्ये ऊर्जेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ऊर्जा वापराच्या प्रमाणावर उत्पादन, क्षेत्रीय विकास व पर्यायाने जीवनमान अवलंबून आहे. ऊर्जेच्या पारंपरिक आणि अपारंपरिक साधनांचा काळजीपूर्वक वापर केल्यास आजच्या ऊर्जा संकटावर थोडी मात केली जाऊ शकते. हाच धागा पकडून सोलापूर रेल्वे विभागाने सोलापूर विभागात ४ हजार ४०० एलईडी बल्ब लावले आहेत़ ज्यातून वर्षाला १३ लाख ८ हजार ७८० युनिटची बचत रेल्वेची होत आहे़ शिवाय भैय्या चौकात असलेल्या रेल्वे हॉस्पिटलवर १० किलो मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभा केला आहे. त्यामुळे वर्षाकाठी १६ हजार युनिटचे उत्पादन होत आहे़ ज्यामुळे १ लाख ४४ हजार रुपयांची बचत होत असल्याचेही व्ही. के. नागर यांनी सांगितले.

वृक्षसंवर्धनाला प्राधान्य- आपण निसर्गाचे काहीतरी देणं लागतो, या बांधिलकीतून सोलापूर रेल्वे विभागाने विभागांतर्गत येणाºया विविध रेल्वे स्टेशनवर वर्षभरात ७५ हजार झाडे लावली आहेत़ या झाडांचे संगोपन व निगा राखण्याची जबाबदारी रेल्वे कर्मचाºयांनी घेतल्याची माहिती अप्पर रेल्वे मंडल प्रबंधक व्ही़ के़ नागर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी रेल्वे विभागाकडून विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत़ भविष्यात १० रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प व ६ नवे पाणी पुनर्प्रक्रिया केंद्र उभाकरण्याचा मानस आहे़ लवकरच या कामांना सुरुवात होईल- व्ही़. के़ नागर, अपर रेल्वे मंडल प्रबंधक, सोलापूर विभाग

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ