शनी २७ जूनला येणार पृथ्वीजवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 05:53 IST2018-06-24T05:53:18+5:302018-06-24T05:53:25+5:30

सूर्यमालेतील विलोभनीय कडा असणारा शनी ग्रह २७ जून रोजी पृथ्वीच्या खूपच जवळ येणार आहे. या दिवशी हा ग्रह अगदी सूर्यासमोर राहील

Saturn will arrive on June 27 near Earth | शनी २७ जूनला येणार पृथ्वीजवळ

शनी २७ जूनला येणार पृथ्वीजवळ

अमरावती : सूर्यमालेतील विलोभनीय कडा असणारा शनी ग्रह २७ जून रोजी पृथ्वीच्या खूपच जवळ येणार आहे. या दिवशी हा ग्रह अगदी सूर्यासमोर राहील. या घटनेला खगोलशास्त्रात प्रतियुती असे म्हणतात. प्रतियुतीच्या आसपास पृथ्वी-शनी हे अंतर सरासरी कमी असते. त्यामुळे या काळात शनीची सुप्रसिद्ध सुंदर कडा अतिशय सुंदर दिसते. मात्र, साध्या डोळ्यांनी ती दिसणार नाही.
शनी-सूर्य प्रतियुती यापूर्वी १५ जून २०१७ रोजी झाली होती. शनीला एकूण ६२ चंद्र असून, सर्वांत मोठा टायटन आहे. शनिला सूर्याभोवती एक फेरी मारण्यास २९.५ वर्षे लागतात. या ग्रहाचा व्यास १,२०,००० कि.मी. आहे. २७ जून रोजी सूर्य मावळल्यावर लगेच शनि ग्रह पूर्व क्षितिजावर उगवेल व पहाटे पश्चिम क्षितिजावर मावळेल. तो रात्रभर आकाशात दिसेल.
काळसर व पिंगट रंगाचा अगदी चमकदार असल्याने तो सहज ओळखता येईल. परंतु, त्याची कडा पाहण्याकरिता टेलिस्कोपची आवश्यकता आहे.
यानंतर ९ जुलै २०१९ रोजी तो पृथ्वीच्या जवळ राहील. या दिवशी पृथ्वी-शनी हे अंतर १३५ कोटी १० लक्ष कि.मी. राहील, अशी माहिती अमरावती एस.आर.पी. कॅम्प स्थित हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी दिली.

Web Title: Saturn will arrive on June 27 near Earth