काँग्रेसला ‘कॅडर बेस’ पक्ष बनविण्याचा ‘सत्त्वशील’ प्रयत्न
By Admin | Updated: August 17, 2014 01:50 IST2014-08-17T01:43:37+5:302014-08-17T01:50:49+5:30
सर्मपित कार्यकर्त्यांची विधानसभा मतदारसंघनिहाय फळी उभारणार!

काँग्रेसला ‘कॅडर बेस’ पक्ष बनविण्याचा ‘सत्त्वशील’ प्रयत्न
संतोष येलकर/अकोला
गेल्या लोकसभा निवडणुकीत समोर आलेले अडथळे आगामी विधानसभा निवडणुकीत येऊ नयेत, यासाठी राज्यात काँग्रेस पक्षाला ह्यकॅडर बेसह्ण पक्ष बनविण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यासाठी पक्षाची ध्येयधोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता राज्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय प्रशिक्षित सर्मपित कार्यकर्त्यांची निवड करण्याचा कार्यक्रम, राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्त्वशिला चव्हाण यांच्या मार्गदर्शनात राबविला जात आहे.
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत समोर आलेल्या अनेक अडथळ्यांमुळे कॉंग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. ते अडथळे आगामी विधानसभा निवडणुकीत येऊ नयेत, यासाठी सत्त्वशिला चव्हाण यांच्या मार्गदर्शनात राज्यभरात प्रशिक्षित कार्यकर्त्यांची ह्यटीमह्ण तयार करण्याचे काम सुरू आहे. पक्ष आणि नेत्यांवरील आरोपांना योग्य प्रकारे उत्तरे देण्यासोबतच, काँग्रेसच्या ध्येय-धोरणांचा, विचारधारेचा योग्य पद्धतीने प्रचार व्हावा, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. पक्षहितासाठी सोशल मीडियाचा वापर करून कार्यकर्त्यांना एकत्रित करणे व पक्षाची शक्ती वाढविण्याकरिता प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान दोन निष्ठावान आणि तळमळीचे कार्यकर्ते तयार करण्याचा कार्यक्रम सध्या राबविला जात आहे. काँग्रेस नेत्यांकडे कमीत-कमी चार-पाच प्रशिक्षित कार्यकर्ते असले पाहिजे, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काय केले पाहिजे, याबाबत कार्यकर्त्याला पूर्णत: जाणीव असली पाहिजे, ही या कार्यक्रमामागची प्रेरणा आहे. त्यासाठी राज्यात विभागनिहाय प्रशिक्षण वर्ग घेऊन, विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी दोन कार्यकर्त्यांची निवड करण्यात येत आहे. प्रशिक्षणानंतर या कार्यकर्त्यांच्या कौशल्याचा उपयोग विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी केला जाणार असल्याची माहिती, सूत्रांनी दिली.
*२८८ मतदारसंघांसाठी ५७६ तळमळीचे कार्यकर्ते!
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात तळागाळापर्यंत जाऊन पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचविणे, पक्षातील गटबाजी दूर करून, सर्व कार्यकर्त्यांना एकत्र आणणे व पक्षाची शक्ती वाढविण्याचे काम करण्यासाठी ह्यकॅडर बेसह्ण कार्यकर्ते तयार करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून राज्यात सुरू आहे. त्यामध्ये विभागनिहाय प्रशिक्षण शिबिर घेऊन, प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी दोन याप्रमाणे निष्ठावान आणि तळमळीच्या कार्यकर्त्यांंची निवड केली जात आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी ५७६ तळमळीच्या कार्यकर्त्यांची निवड करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
*सात प्रशिक्षकांकडून निष्ठावान कार्यकर्त्यांंची निवड!
कार्यकर्त्यांंची निवड सात प्रशिक्षकांकडून केली जात आहे. विनयकुमार आवटे यांच्या नेतृत्वातील या प्रशिक्षकांच्या चमूमध्ये विरजकुमार प्रसाद, प्रल्हाद माळी, हेमंत सामंत, स्वप्नेश माळी व अशोक दुबे यांचा समावेश आहे. विभागनिहाय प्रशिक्षण शिबिरांसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून पाच कार्यकर्ते बोलावून, त्यापैकी दोन कार्यकर्त्यांंची निष्ठावान आणि पूर्ववेळ तळमळीचा कार्यकर्ता म्हणून निवड केली जात आहे. अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ या पाच जिल्ह्यांमधील कार्यकर्त्यांचे विभागीय प्रशिक्षण शनिवारी अकोल्यातील कामगार कल्याण मंडळाच्या सभागृहात पार पडले. त्यामध्ये पाचही जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी दोन याप्रमाणे निष्ठावान कार्यकर्ता म्हणून निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
*सत्त्वशिला चव्हाण यांच्या उपस्थितीत सोमवारी बुलडाण्यात प्रशिक्षण!
अमरावती विभागातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी निष्ठावान आणि तळमळीचा कार्यकर्ता म्हणून निवड करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांंचे प्रशिक्षण १७, १८ व १९ ऑगस्ट रोजी बुलडाणा येथे आयोजित करण्यात आले आहे. या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात १८ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्त्वशिला चव्हाण कार्यकर्त्यांंना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.