शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

“आम्हाला घरदार नाही, लेकरांना उन्हात बसावं लागतंय”; खोक्याच्या पत्नीचे उपोषण, मागण्या काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 14:00 IST

Satish Bhosale Khokya News: सतीश भोसले याच्या पत्नीने नेमक्या कोणत्या मागण्या समोर ठेवल्या आहेत?

Satish Bhosale Khokya News: बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच 'खोक्या' उर्फ गुंड सतीश भोसले याचे काही गैरप्रकार आणि पैशाचा माज दाखवणारे व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्याने एका व्यक्तीला अमानुषपणे बेदम मारहाण केल्याचेही प्रकरण समोर आले होते. तो आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचेही स्पष्ट झाले होते. पोलीस शोध घेत असताना अखेर खोक्याला प्रयागराजमधून पोलिसांनी बेड्या ठोकल्या. बीड पोलीस सतीश भोसले याला घेऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचले. तत्पूर्वी सतीश भोसलेच्या ठिकाणांवर वनविभागाने बुलडोझर चालवत कारवाई केली. यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया आल्या. यानंतर आता सतीश भोसले याच्या पत्नीने उपोषण सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. 

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खोक्याच्या पत्नीने आमरण उपोषण सुरू केले आहे. घर पाडणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा. ८ घरे वनविभागाने उद्ध्वस्त केली. आम्हाला त्याच गावात शासनाने जागा उपलब्ध करून पक्के घर बांधून द्यावे. ढाकणे परिवाराला झालेल्या मारहाणीत सतीश भोसले त्याचे तीन भाऊ व वडील यांचा काही संबंध नाही, तरीसुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल केले त्यांना निर्दोष मुक्त करावे. फरार आरोपींना तात्काळ अटक करावी. माझा नवरा आमचा परिवार व पारधी समाज यांच्या विरोधात खोटा अपप्रचार सुरू आहे तो तात्काळ थांबवण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या पत्नीने केल्या आहेत.

आम्हाला घरदार नाही, लेकरांना उन्हात बसावे लागते

आमचे घर वन खात्याने उद्ध्वस्त करून टाकले आहे. आमचे पुनर्वसन करण्यात यावे. आम्हाला घरदार नाही, आमच्या लेकरांना उन्हात बसावे लागत आहे. आमचे मालक अटक झाले पुढचे आरोपी अटक झाले पाहिजे. आमच्या महिलांना मारहाण केली. गावगुंडे कोणते आहेत, त्यांना शोधून घेतला पाहिजे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार आहे, असा निर्धार पत्नीने व्यक्त केला. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सतीश भोसलेच्या बहिणीने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. सतीश भोसले माझा भाऊ आहे. मी या प्रकरणात आजपर्यंत आले नव्हते. त्याची जी काही चौकशी चालू आहे ते आम्ही मोबाइलवर पाहात होतो. जो काही अन्याय होतोय तो खरा आहे का खोटा वगैरे कळेलच. पोलिसांची चौकशी सुरू आहे. ही कायदेशीर चौकशी आम्हाला मान्य आहे. पण बुलडोझरने त्यांचे घर पाडले. २-४ तासांनी असे समजले की, त्यांचे घर पेटवून दिले. आम्हाला रात्री समजले. आम्ही सकाळी ताबडतोब इथे आलो. त्यांचे घरदार पाडण्यात आले. लहान मुलींना मारहाण झाली. त्यांच्यांवर बीडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना बघण्यासाठी आम्ही इथे आलो आहेत. आमची विनंती एवढीच आहे की, आम्हाला न्याय मिळवून द्यावा. हे सगळे करणाऱ्या लोकांना अटक करा, अशी मागणी खोक्या भोसलेच्या बहि‍णींनी केली. 

 

टॅग्स :BeedबीडBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeed policeबीड पोलीस