शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
2
'ते' खासदार कोण? महिला डॉक्टरने दोन पीएंची पोलिसांकडे केलेली लेखी तक्रार; आतेभावाचा मोठा खुलासा
3
भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू
4
Honda vs Suzuki: होन्डा अ‍ॅक्टिव्हा आणि सुझुकी अ‍ॅक्सेसमध्ये चुरस; कोण आहे 'स्मार्ट फीचर्स'चा खरा किंग? वाचा
5
खळबळजनक दावा! सत्ताधारी २१ आमदारांना 'दिवाळी गिफ्ट'; एकाच ठेकेदारानं दिल्या आलिशान डिफेंडर कार?
6
चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपा कार्यकर्त्यांना तंबी; "सर्वांचे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर..."
7
मुलगा की मुलगी? नवजात अर्भकांच्या अदलाबदलीवरून दोन कुटुंबांमध्ये हॉस्पिटलमध्येच वाद
8
हेअर फॉलचा वैताग! लसूण की कांद्याचा रस... काळ्याभोर लांब, जाड केसांसाठी सर्वात बेस्ट काय?
9
भारतीय नौदल चीन, पाकिस्तान, तुर्कीला धक्का देणार! तीन पावले उचलली
10
लग्नानंतर तापसी पन्नूने सोडला देश? डेन्मार्कला शिफ्ट झाल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचं स्पष्टीकरण
11
Numerology: ५, १४, २३ तारखेला जन्मलेल्या मुलींवर असतो बुधाचा प्रभाव; अत्यंत बुद्धिमान असतो स्वभाव!
12
विराट कोहली दोनदा शून्यावर बाद; सुनील गावसकरांनी मांडलं सडेतोड मत, म्हणाले- दोन सामन्यात...
13
VIDEO: देसी महिलेचा धुमाकूळ! 'हुस्न तेरा तौबा' गाण्यावर इतका विचित्र डान्स कधीच पाहिला नसेल
14
मोजतानाही लागेल धाप! IPO येण्याआधीचं Jio कंपनीचं मूल्यांकन बाप रे बाप...!
15
Railway: रेल्वे ट्रॅकजवळ रील बनवणाऱ्यांची आता खैर नाही; प्रशासनानं उचललं कठोर पाऊल!
16
मुख्यमंत्री फडणवीस अन् मनोज जरांगे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार? चर्चांना उधाण...
17
Shraddha Walker : "श्रद्धा वालकरवर अजूनही अंत्यसंस्कार झालेच नाहीत"; आफताबने ३ वर्षांपूर्वी केलेली निर्घृण हत्या
18
Satara Crime: महिला डॉक्टरवर अत्याचार करणारा पीएसआय गोपाल बदने फरार; महिला आयोगाने घेतली दखल
19
Social Media Earning: इन्स्टाग्राम आणि युट्यूबवरून कसे कमवता येतात पैसे? तुम्हीही बनू शकता लखपती! जाणून घ्या
20
सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमधील RSS कार्यालयावर वंचितचा जनआक्रोश मोर्चा

"अशी घाणेरडी, गलिच्छ कृती केल्यास..."; सातारा महिला डॉक्टर प्रकरणात सुप्रिया सुळेंचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 14:20 IST

Satara Crime Lady Doctor Case: महिला डॉक्टरवर ४ महिने पोलिस इन्स्पेक्टरने बलात्कार केल्याचा आरोप

Satara Crime Lady Doctor Case: साताऱ्यातील फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ महिला डॉक्टरनेपोलिसांच्या जाचाला कंटाळून आपले जीवन संपवले. ही महिला डॉक्टर काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागाच्या वादात अडकली होती. तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर तिची चौकशी सुरू झाली. या चौकशीमुळे ती मानसिक तणावात होती. त्यातच, पोलिस निरीक्षक गोपाल बदनेने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अखेर हे सारं सहन न झाल्याने हातावर सुसाईड नोट लिहून तिने आत्महत्या केली. घडलेल्या प्रकारानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या संदर्भात संतप्त प्रतिक्रिया दिली.

"हा प्रकार धक्कादायक आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रात अशा घटना होत आहेत हे अतिशय लाजिरवाणं आहे. अशा घटनेने महाराष्ट्रातील सर्वांचीच मान शरमेने खाली जाते. हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. असे प्रकार आपल्या संस्कारात बसत नाहीत. त्यामुळे माझा आग्रह आहे की या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे. कुणीही अशी घाणेरडे, गलिच्छ कृत्य केल्यास त्या माणसाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे," असे सडेतोड मत सुप्रिया सुळे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मांडले.

"मी आधी अनेक वेळा हा मुद्दा मांडला आहे की कृपा करून फास्ट ट्रॅक कोर्ट करा आणि अशा गुन्हेगारांना थेट फाशी द्या. अशा प्रकरणांमध्ये गंभीर दखल घेऊन उदाहरण उभे करण्याची नितांत गरज आहे की, महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकार अशा प्रकारच्या घटना खपवून घेणार नाही आणि असे प्रकार सहन केले जाणार नाहीत," अशी मागणीही त्यांनी केली.

तसेच, सोशल मीडिया एक्सवरही त्यांनी आपल्या भावना मांडल्या. "फलटण, जि. सातारा येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरचे आत्महत्या प्रकरण अतिशय गंभीर आहे. या महिलेने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने गेली काही दिवसांपासून तिचा शारिरीक आणि मानसिक छळ होत असल्याचे वरीष्ठांना वारंवार कळविले होते. परंतु तिच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. अखेर तिने टोकाचे पाऊल उचलले. या विषयाच्या मूळाशी नेमके कोणते कारण आहे? या महिलेच्या तक्रारीची दखल का घेतली गेली नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. संबंधित महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना शिक्षा होणे आवश्यक आहे. माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आग्रही मागणी आहे की या प्रकरणाची चौकशी करुन दोषी व्यक्तींना कठोर शासन करावे. आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या तसेच राज्यातील प्रत्येक महिलेला सुरक्षित वातावरण मिळालेच पाहिजे ही आमची भूमिका आहे," असे त्यांनी लिहिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Supriya Sule Demands Justice in Satara Doctor Suicide Case

Web Summary : Supriya Sule expressed outrage over the Satara doctor's suicide, allegedly driven by police harassment and sexual assault. She demanded a swift, transparent investigation and the harshest punishment, including the death penalty, for those responsible, emphasizing the need for a safe environment for women.
टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीSupriya Suleसुप्रिया सुळेdoctorडॉक्टरPoliceपोलिस