शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
2
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
3
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
4
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
5
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
6
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
7
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
8
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
9
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
10
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
11
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
12
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
13
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
14
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
15
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
16
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
17
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
18
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
19
Car Offers: निसान मॅग्नाइट, होंडा एलिव्हेटसह 'या' लोकप्रिय मॉडेल्सवर ३.२५ लाखांपर्यंत सूट!
20
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
Daily Top 2Weekly Top 5

Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 17:27 IST

Abhijeet Bichukale Votes, Satara Baramati Assembly Election 2024 Result Live Updates: अभिजीत बिचुकले यांनी बारामती आणि सातारा अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती

Abhijeet Bichukale, Worli Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result Live: विधानसभा निवडणुकीत २० नोव्हेंबरला झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी करण्यात आली. त्यात भाजप-शिंदे-अजितदादा महायुतीला मोठा विजय मिळाला. राज्यात राष्ट्रीय आणि स्थानिक पक्षाची संख्या खूप जास्त असली तरीही यंदाची निवडणूक ही प्रामुख्याने महायुती विरूद्ध महाविकास आघाडी या दोन गटात होती. त्यामुळे निवडणुकीच्या निकालात काँटे की टक्कर पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. पण महायुतीने थेट २०० पार मजल मारली. यंदाच्या निवडणुकीत 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांनीदेखील उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. आमदारकीपासून देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत निवडणूक लढवून चर्चेत असणारे अभिजीत बिचुकले चौथ्यांदा सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. तसेच, पवार विरूद्ध पवार अशी चर्चेतील लढत असलेल्या बारामतीतूनही ते उभे होते. दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला. पाहूया त्यांनी किती मते मिळाली.

साताऱ्यात अभिजीत बिचुकले सहाव्या क्रमांकावर

सातारा मतदारसंघात भाजपाच्या तिकीटावर शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी निवडणूक जिंकली. त्यांनी तब्बल १,४२,१२४ मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली. त्यांची लढत शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटाचे अमित कदम यांच्याविरोधात होती. शिवेंद्रराजे यांना एकूण १,७६,८४९ मते मिळाली तर दुसऱ्या क्रमांकाच्या अमित कदम यांना ३४,७२५ मतांवर समाधान मानावे लागले. या यादीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या डॉ. अभिजीत आवाडे-बिचुकले यांना एकूण ५२९ जागा मिळाल्या.

बारामतीत अभिजीत बिचुकलेंचे डिपॉझिट जप्त

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यापासून पवार विरूद्ध पवार असे दोन सामने झाले. त्यात पहिल्या सामन्यात सुप्रिया सुळेंच्या विजयासह शरद पवार गट वरचढ ठरला होता. यावेळी अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार असा सामना रंगला होता. यात शरद पवार गटाच्या युगेंद्र पवारांना ७९,०६४ मते मिळाली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना १,७८,१०९ मते मिळाली. या मतदारसंघातही अभिजीत बिचुकले यांना काहीही प्रभाव पाडता आला नाही. अभिजीत बिचुकले यांना साधी शंभरीही गाठता आली नाही. त्यांना अवघी ९२ मते मिळाली.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४abhijeet bichukaleअभिजीत बिचुकलेsatara-acसाताराbaramati-acबारामतीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024