साता-याजवळ जीप उलटून ४ जण ठार

By Admin | Updated: March 3, 2016 09:22 IST2016-03-03T09:21:48+5:302016-03-03T09:22:08+5:30

पुणे-सातारा महामार्गावर शिरवळ गावच्या प्रवासी जीप उलटून झालेल्या भीषण अपघातात चार युवक ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.

Satara-4 jawans dead in Jeep | साता-याजवळ जीप उलटून ४ जण ठार

साता-याजवळ जीप उलटून ४ जण ठार

>ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. ३ -  पुणे-सातारा महामार्गावर शिरवळ गावच्या प्रवासी जीप उलटून झालेल्या भीषण अपघातात चार युवकांचा मृत्यू झाला असून एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. मध्यरात्री साडेबाराच्या ते दीड दरम्यान हा भीषण अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व युवक भोरमधील रहिवासी असून ते काल शिरवळ येथे आले होते. काल रात्री परतीच्या मार्गावर असताना शिरवळजवळील ट्यूबवेल कंपनीसमोर त्यांच्या जीपला अपघात झाला. अंधारात जीप एका सिमेंटच्या कठड्याला धडकली आणि उलटली. ही धडक एवढी भीषण होती की चार तरूण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला. प्रशांत राऊत, गणेश घोणे, दस्तगीर नाणकेकर आणि आतुल बरकडे अशी मृतांची नावे असून हणमंत निगडे हा युवक गंभीर जखमी असून त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 

Web Title: Satara-4 jawans dead in Jeep