सरपंचांनी केला आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: July 4, 2016 22:15 IST2016-07-04T21:49:31+5:302016-07-04T22:15:22+5:30
रावेर शहरातील बऱ्हाणपूर रोडवरील न. पा. कॉम्प्लेक्स समोर ४० हजार पैकी ३० हजार केळीची रोपं वितरकाने बाग लागवडीसाठी देण्यास नकार दिला

सरपंचांनी केला आत्महत्येचा प्रयत्न
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 4 - रावेर तालुक्यातील खिरोदा प्र. यावल येथील सरपंच आणि प्रगत शेतकरी किशोर उर्फ गंपा चौधरी यांनी आज रावेर शहरातील बऱ्हाणपूर रोडवरील न. पा. कॉम्प्लेक्स समोर ४० हजार पैकी ३० हजार केळीची रोपं वितरकाने बाग लागवडीसाठी देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या चौधरी यांनी विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आज दुपारी १ वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याने शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. यासंबंधी रावेर पोलिसात कोणतीही नोंद झाली नसून, रूग्ण किशोर चौधरी यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. आर एस पाटील यांनी स्पष्ट केले आहे.