सरपंचासह अधिकारी अडचणीत
By Admin | Updated: August 15, 2016 03:49 IST2016-08-15T03:49:28+5:302016-08-15T03:49:28+5:30
तालुक्यातील खंडाळे ग्रामपंचायतीने माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीमध्ये तफावत असल्याचे उघड झाले आहे.

सरपंचासह अधिकारी अडचणीत
अलिबाग : तालुक्यातील खंडाळे ग्रामपंचायतीने माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीमध्ये तफावत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश गोटे यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
खंडाळे ग्रामपंचायतीने अरुण गोंधळी यांना माहितीच्या अधिकारामध्ये २१ आॅक्टोबर २०१५ रोजी खंडाळे ग्रामपंचायतीच्या ३० मे २०१५ च्या मासिक सभेचे इतिवृत्त दिले होते. खंडाळे ग्रामपंचायत इतर माहिती देत नाही म्हणून गोंधळी यांनी अलिबाग पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राठोड यांच्याकडे अपील केले होते. या अपिलाची सुनावणी दोनच दिवसांपूर्वी पंचायत समितीकडे झाली. त्यावेळी विद्यमान ग्रामसेविका बेलोसकर व तत्कालीन ग्रामसेवक प्रवीण पाटील हे उपस्थित होते. यावेळी गोंधळी यांना खंडाळे ग्रामपंचायतीच्या ३० मे २०१५ च्या मासिक सभेच्या इतिवृत्ताची प्रत पुन्हा देण्यात आली. ती प्रत पाहून गोंधळी हे चक्र ावूनच गेले. गोंधळी यांना पूर्वी माहिती अधिकारात दिलेल्या इतिवृत्तामध्ये रूळे कोळोशी येथे ८३ हजार ३९४ इतक्या रकमेचे जळीत ओटा बांधणे या कामाचा उल्लेख केलेला नव्हता. तो या इतिवृत्तामध्ये दिसून येत होता. राज्य शासनाचा व केंद्र शासनाचा निधी हडप करणे हाच एकमेव उद्देश असल्याचे तक्र ारदार अरु ण गोंधळी व सुरेश खंडागळे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश गोटे यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. गोटे यांनी याची गंभीर दखल घेवून जि.प.च्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांना प्रकरणात तत्काळ पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्याचे लेखी आदेश
निवेदनावर दिले. (प्रतिनिधी)
>विस्तार अधिकाऱ्यांकडे के ले अपील
खंडाळे ग्रामपंचायतीने अरुण गोंधळी यांना माहितीच्या अधिकारामध्ये २१ आॅक्टोबर २०१५ रोजी खंडाळे ग्रामपंचायतीच्या ३० मे २०१५ च्या मासिक सभेचे इतिवृत्त दिले होते. खंडाळे ग्रामपंचायत इतर माहिती देत नाही म्हणून गोंधळी यांनी अलिबाग पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राठोड यांच्याकडे अपील केले होते.
गोंधळी यांना खंडाळे ग्रामपंचायतीच्या ३० मे २०१५ च्या मासिक सभेच्या इतिवृत्ताची प्रत पुन्हा दिली. यामध्ये गोंधळी यांना पूर्वी माहिती अधिकारात दिलेल्या इतिवृत्तामध्ये रूळे कोळोशी येथे ८३ हजार ३९४ इतक्या रकमेचे जळीत ओटा बांधणे या कामाचा उल्लेख केलेला नव्हता.