धनगर आरक्षणाच्या आंदोलनावेळी भाषण करताना सरपंचाने विष प्यायले; आंदोलकांची धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 15:31 IST2024-09-14T15:30:59+5:302024-09-14T15:31:16+5:30
धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी पंढरपूरमध्ये हे आंदोलन सुरु आहे.

धनगर आरक्षणाच्या आंदोलनावेळी भाषण करताना सरपंचाने विष प्यायले; आंदोलकांची धावपळ
धनगर उपोषणाला पाठिंबा देण्याचे भाषण करत असताना आलेगाव येथील सरपंच अमोल देवकाते यांनी विषारी औषध घेत केला आत्महत्येचा प्रयत्न केला, यामुळे आंदोलनस्थळी मोठी धावपळ उडाली.
धनगर समाजातील अमोल देवकते या कार्यकर्त्याने उपोषण स्थळी विषारी औषध प्राशन केले. देवकाते यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती बिघडली असून उपचार सुरु करण्यात आले आहेत.
धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी पंढरपूरमध्ये हे आंदोलन सुरु आहे. या उपोषणस्थळी भाजप विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट दिली.
आरक्षणाच्या मागणीवर निश्चितपणे काहीतरी तोडगा निघेल. चारही बाजूने आमच्या समाजाच्या लोकांचा प्रयत्न सुरू आहे. कार्यकर्ते, नेते मंडळी ताकदीने प्रयत्न करत आहेत. सरकार आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देत आहे. त्यांनी निर्णयापर्यंत यावे, हीच आमची अपेक्षा आहे, असे पडळकर म्हणाले.