‘राज्यभर सरदार पटेलांचे योगदान पोहोचविणे गरजेचे’

By Admin | Updated: January 21, 2017 03:05 IST2017-01-21T03:05:40+5:302017-01-21T03:05:40+5:30

वल्लभभाई पटेल यांनी दिलेले महत्त्वपूर्ण योगदान महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिक, विद्यार्थी, शिक्षकांपर्यंत अगदी कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची गरज आहे

'Sardar Patel's contribution to the state is needed' | ‘राज्यभर सरदार पटेलांचे योगदान पोहोचविणे गरजेचे’

‘राज्यभर सरदार पटेलांचे योगदान पोहोचविणे गरजेचे’


मुंबई : भारताच्या एकसंघतेसाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेले महत्त्वपूर्ण योगदान महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिक, विद्यार्थी, शिक्षकांपर्यंत अगदी कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची गरज आहे, असे मत राज्यपाल विद्यासागर राव यांनी केले.
गुरुवारी मुंबईत नेहरू विज्ञान केंद्रात ‘युनायटिंग इंडिया : रोल आॅफ सरदार पटेल’ या सरदार पटेल यांच्या कार्यावरील डिजिटल प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल राव यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
नवी दिल्लीतल्या नेहरूविज्ञान केंद्रात पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ आॅक्टोबर २०१६ रोजी उद्घाटन केलेल्या प्रदर्शनाची धावती झलक आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचा प्रकल्प असून, स्वत: पंतप्रधानांनी यात लक्ष घातले आहे. त्रिमिती चित्रपट तंत्रज्ञानासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रदर्शनात एकसंघ भारत निर्माण करण्यात सरदार पटेलांची भूमिका उलगडून दाखविण्यात आली आहे. एकसंघ भारतात सहभागी होण्यासाठी विविध संस्थानांनी स्वाक्षरी केलेले दस्तावेजही प्रदर्शनात आहेत. यापूर्वी हे धावते प्रदर्शन जुनागढ इथे भरले होते. (प्रतिनिधी)

Web Title: 'Sardar Patel's contribution to the state is needed'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.