शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

सारंगखेडा घोडेबाजार : पाच कोटींची ‘पद्मा’, महाराणा प्रताप यांच्या चेतकची वंशज असल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 1:29 AM

देशात सर्वाधिक ७२ इंच उंचीच्या ‘पद्मा’ घोडीचे गुरुवारी सारंगखेडा अश्व बाजारात आगमन झाले़ या घोडीला पाहण्यासाठी येथे अश्वप्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती़ गेल्या वर्षीही ‘पद्मा’ ही चर्चेचा विषय ठरली होती.

सारंगखेडा ता. शहादा (जि. नंदुरबार) : देशात सर्वाधिक ७२ इंच उंचीच्या ‘पद्मा’ घोडीचे गुरुवारी सारंगखेडा अश्व बाजारात आगमन झाले़ या घोडीला पाहण्यासाठी येथे अश्वप्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती़ गेल्या वर्षीही ‘पद्मा’ ही चर्चेचा विषय ठरली होती.इंदोर येथील पद्मा हॉर्स फॉर्मचे मालक बालकृष्ण चंदेल यांच्या मालकीची ही घोडी असून, नऊ फूट लांब, सात क्विंटल वजन असलेली काठेवाडी जातीची नुकरी घोडी आहे. पद्माचे वय ४ चार वर्षे व ११ महिने आहे. ती महाराणा प्रताप यांच्या चेतक या घोड्याची वंशज असल्याचा चंदेल यांचा दावा आहे. तिची किंमत पाच कोटी रुपये असून, ती दोन कोटींपर्यंत पुष्कर मेळ्यात मागितली गेलीहोती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण व पंतप्रधान मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी घोडीचे मालक चंदेल यांचा गौरव केल्याची छायाचित्रे या ठिकाणी लावण्यात आली आहेत़ त्याचबरोबर पर्यटनमंत्री जयकुमार रावल, चेतक फेस्टिव्हलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, मंजितसिंह तोमर, विजयसिंह परिहार, श्रीलंका येथील अधूला या अश्वप्रेमींनीही तिचा गौरव केला आहे.पद्माच्या देखभालीसाठी पाच जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. दररोज तीन लीटर गायीचे दूध, दोन किलो चना डाळ, पाच किलो चापड भुसा, हिरवा चारा असा खाद्य पदार्थांचा तिचा खुराक असतोे. दररोज एक तास तिची मसाज व एक तास रपेट घेतली जाते.सारंगखेडा येथील आयोजन नियोजन भारतातील इतर यात्रांपेक्षा वेगळे आहे, असे बालकृष्ण चंदेल म्हणाले. गेल्या दोन वर्षांपासून ते या यात्रेत ही पद्मा घोडी घेऊन येत आहेत. त्यांच्या फार्मवर अजून चार घोडे उच्च जातीचे आहेत.देशातील सर्वांत उंची घोडीयात्रोत्सवात पद्मा ही घोडी दाखल झाली आहे़ तब्बल ७२ इंच उंच असलेली पद्मा ही देशातील सर्वांत उंच घोडी आहे़ घोडेबाजारात या घोडीची किंमत तब्बल पाच कोटी रुपये असून पांढºया शुभ्र पद्माला पाहण्यासाठी गर्दी उसळली आहे़ गेल्या वर्षीदेखील पद्मा चर्चेचा विषय ठरली होती़

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र