महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी संतोष मंडलेचा

By Admin | Updated: April 26, 2017 01:40 IST2017-04-26T01:40:46+5:302017-04-26T01:40:46+5:30

महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी नाशिकचे संतोष मंडलेचा यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. जून महिन्यात ते पदभार स्वीकारतील.

Santosh Mandalay as president of Maharashtra Chamber of Commerce | महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी संतोष मंडलेचा

महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी संतोष मंडलेचा

नाशिक : महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी नाशिकचे संतोष मंडलेचा यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. जून महिन्यात ते पदभार स्वीकारतील. वरिष्ठ उपाध्यक्षपदी मुंबईचे अमित कामत यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चरच्या अध्यक्षपदी वरिष्ठ उपाध्यक्षांचीच निवड होते. मंडलेचा हे विद्यमान वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. नाशिक रोड येथील जैन समाजाचे ते महामंत्री आहेत.
अध्यक्षपदाच्या माध्यमातून उद्योजक, व्यावसायिक आणि कृषी क्षेत्रासाठी कामे करण्याची मोठी संधी मिळाली आहे. नवीन जीएसटी कायदा सुटसुटीत पद्धतीने लागू करावा. त्याचप्रमाणे, शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंडलेचा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Santosh Mandalay as president of Maharashtra Chamber of Commerce