शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांच्या साडूकडून एकाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 18:17 IST

Santosh Deshmukh Murder Case: मागच्या काही दिवसांपासून बीडमधील गावगुंडांकडून केल्या जाणाऱ्या गुन्हेगारी कृत्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू आणि बेडुकवाडी गावचे सरपंच दादा खिंडळकर यांनी केलेल्या मारहाणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली निर्घृण हत्या आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक समोर येत असलेल्या गुन्हेगारी कृत्यांमुळे मागच्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा चर्चेत आहे. त्यातच बीडमधील गावगुंडांकडून केल्या जाणाऱ्या गुन्हेगारी कृत्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू आणि बेडुकवाडी गावचे सरपंच दादा खिंडळकर यांनी केलेल्या मारहाणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ बीडमधील बाभूळवाडी गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे. तेथे एका शेतामध्ये काही जणांच्या टोळक्याकडून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचं व्हिडीओ चित्रिकरणही करण्यात आलं. दरम्यान, मारहाण करणाऱ्यांमध्ये बेडुकवाडचे सरपंचं दादा खिंडळकर यांचाही समावेश होता. तसेच हे दादा खिंडळकर हे संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचे साडू असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, कायदा सर्वांसाठी समान असून, या प्रकरणात योग्य ती कारवाई होईल, असं विधान धनंजय देशमुख यांनी केलं आहे.

दरम्यान, धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडळकर हे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर झालेल्या आंदोलनांमध्ये धनंजय देशमुख यांच्यासोबत अनेकदा दिसून आले होते. आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दादा खिंडळकर यांचीही प्रतिक्रिया समोर आली असून, ते म्हणाले की, मी ज्या धनंजय देशमुख कुटुंबासोबत आहे, त्या कुटुंबापासून दूर करण्याचा हा प्रयत्न आहे. ज्या ज्या व्यक्तींनी देशमुख कुटुंबाला मदत केली आहे. त्या त्या कुटुंबांना असे व्हिडीओ समोर आणून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न आहेत. मात्र आरोपींना वाचवता येईल, असं मला वाटत नाही, असा दावाही दादा खिंडळकर यांनी केला आहे.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणBeedबीडCrime Newsगुन्हेगारीBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या