शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

"माझे वडील मुलांसाठीतरी जगू द्या, अशी विनवणी करत होते,पण…’’, शोकाकुल वैभवी देशमुखचा सवाल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 22:20 IST

Vaibhavi Deshmukh on Santosh Deshmukh Murder: मला माझ्या मुलांसाठी तरी जगू द्या अशी विनवणी माझ्या वडिलांनी केल्यानंतरही आरोपींना काहीच वाटलं नाही. त्यावेळी त्यांना त्यांची मुलं आठवली नाहीत का? असा भावूक सवालही वैभवी देशमुख हिने यावेळी केला. 

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करताना आरोपींनी त्यांचा केलेला अमानुष छळ आणि देहाच्या केलेल्या विटंबनेचे केलेले फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. आपल्या भावाचे केलेले हाल पाहून संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनाही आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. आता संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिनेही तिच्या वडिलांच्या करण्यात आलेल्या छळाबाबत मौन सोडलं आहे. आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून देत वैभवी देशमुख हिने तिच्या वडिलांची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींनी केलेल्या क्रौर्याची छायाचित्रे आरोपपत्रामधून समोर आली होती. ही छायाचित्रे पाहिल्यानंतर देशमुख यांची लेक वैभवी देशमुख हिच्याही भावना अनावर झाल्या. आरोपींनी आपल्या वडिलांसोबत केलेल्या क्रौर्याबाबत प्रसारमाध्यमांकडे भावना व्यक्त करताना वैभवी देशमुख म्हणाली की, माझ्या वडिलांच्या मृत्यूला आता तीन महिने होत आले तरी हे दु:ख कधीच न संपण्यासारखं आहे. ते असे व्यक्ती होते की कुटुंबीयांच्याच नाही तर गावकऱ्यांच्या मनातूनही त्यांच्या आठवणी जात नाही आहेत. माझ्या वडिलांच्या हत्येची जी छायाचित्रे समोर आली आहेत, ती पाहून माझ्या कुटुंबाची लढण्याची ताकदच संपून जात आहे. माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यामुळे आम्ही फार दु:ख व्यक्त करतही बसू शकत नाही. माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे, अशी आमची भावना आहे.

वैभवी देशमुख पुढे म्हणाली की, हे सर्व कोण घडवून आणतंय हा आमच्यासमोरचा प्रश्न आहे. कारण या प्रकरणातील एक आरोप अजूनही फरार आहे. तसेच या फोटोंमध्ये दिसत असल्याप्रमाणे माझ्या वडिलांना एवढी अमानुषपणे मारहाण करतानाही आरोपी हसताहेत. मला माझ्या मुलांसाठी तरी जगू द्या अशी विनवणी माझ्या वडिलांनी केल्यानंतरही आरोपींना काहीच वाटलं नाही. त्यावेळी त्यांना त्यांची मुलं आठवली नाहीत का? असा भावूक सवालही वैभवी देशमुख हिने यावेळी केला. "हात पाय तोडा, पण…’’, संतोष देशमुख यांनी हत्येपूर्वी नराधम आरोपींना करत होते अशी विनंती

ही घटना खंडणीमुळे घडली आहे. तसेच आरोपी माझ्या वडिलांना एवढ्या अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहेत, त्यामुळे या आरोपींच्या मागे कुणाचा हात आहे आणि ही खंडणी जातेय ती कुणासाठी जातेय. तसेच हे कृत्य करण्यासाठी या लोकांना कुणी पाठवलं होतं, हा आमच्यासमोर पडलेला प्रश्न आहे, असे वैभवी देशमुख पुढे म्हणाली.  

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणCrime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारBeedबीड